भोला कागल व रजनीताई मगदूम उद्घाटन प्रसंगी |
*रमेशकुमार मिठारे : मजरेवाडी प्रतिनिधी*
मजरेवाडी : कोल्हापूर जिल्हयाचे हरितक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय देशभक्त डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार अण्णा यांच्या तालमीत तयार झालेले व अण्णांचे विश्वासू कार्यकर्ते मा.भोला कागले हे धाडसाने काम करत असताना बहुजन समाजाला बरोबर घेऊन घेतलेले काम पुर्णत्वास नेतात.त्यांच्या या धाडसी कार्याचे कौतुक करावेसे थोडे कमीच आहे.असे मत देशभक्त डॉ रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या कन्या सौ रजनीताई मगदुम यांनी मजरेवाडी येथील हनुमान व गणेश मंदिराच्या स्लॅप सोहळा प्रसंगी बोलत होत्या.
याला समर्थन करत कागले म्हणाले की, लोकांनी आजपर्यंत माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे त्यामुळे धाडसीपणाने मी काम करत आहे असे म्हणत त्यांनी देणगीदारांचे आभार मानले.
या वेळी इचलकरंजीच्या नगराध्यक्षा अलका स्वामी म्हणाल्या की, हल्ली मोबाईल जमान्यात पारकट्टयावरच्या गप्पा बंद होऊन माणुस माणसापासून दुरावला जात आहे.मात्र मजरेवाडीकरांनी गावात मंदिर व सभागृह बांधण्याचा जो निर्णय घेतला आहे तो योग्य असुन मंदिरामुळे परिसरातील भागात सकारात्मक उर्जा तयार होउन मानवी जीवन व आरोग्य आनंदी राहते.
या सोहळ्याला सरपंच संगिता परीट, पोलीस पाटील-वंदना दत्तवाडे, कुंभार गटाचे-बाबुराव पाटील, डॉ.सी.डी.पाटील,माजी उपसरपंच-दिनकर नरुटे, शंकर गवंडी, विजयकुमार गवंडी, आण्णाप्पा दत्तवाडे,शिवानंद मठपती,भालचंद्र खुरपे, दिलीप पट्टेकरी,गणेश हेरवाडे,आप्पा कारंडे,भरमा कारंडे,अजित माळी, सुनिल बुबनाळे, इंजिनिअर-अनिल पाटील, अभिजित दत्तवाडे व भावीक उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत मंदिरांचे प्रेरणादायक, माजी सभापती भालचंद्र कागले यांनी केले.आभार माजी सरपंच शिवराया गवंडी यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा