Breaking

रविवार, १७ ऑक्टोबर, २०२१

आनंदी जीवन जगण्यासाठी आपल्या आचार व विचारांशी नाळ जोडणाऱ्या व्यक्तींच्या सहवासात रहा : प्रा.डी.जी.धट

 

प्रा.डी.जी.धट सत्काराच्यावेळी उत्तर देताना

रमेशकुमार मिठारे  : मिरज विशेष प्रतिनिधी


मिरज : सुख म्हणजे नेमकं काय असतं ते अनुभवण्यासाठी नेहमी आपल्या विचारांच्या व्यक्तींच्या सहवासात राहिल्यामुळे मी व माझा परिवार नेहमी आनंदी जीवन जगत असल्याचे सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रा.डी.जी.धट यांनी सत्काराला उत्तर देताना म्हंटले.

      मा.प्रा.डी.जी धट हे मुळचे पंढरपूर येथील असुन ते नोकरीस सहकार भुषण एस के पाटील महाविद्यालय कुरूंदवाड येथे ३७ वर्षे अर्थशास्त्राचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते.ऑगस्ट २०२० मध्ये ते सेवानिवृत्त झाले मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे सेवानिवृत्तीचा कार्यक्रम वेळेत घेता आला नसल्याने सदर कार्यक्रम आज पटवर्धन सभागृह मिरज येथे आयोजित करण्यात आला होता .

       सुरुवातीस कार्यक्रमाचे  प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध उद्योजक मा.अविनाश पोरे यांनी प्रा.धट यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडत असताना म्हणाले, जट त्याने आपल्या आयुष्य विद्यार्थी व समास याच्यासाठी खर्ची घातले असून यापुढे त्यांनी परिवार व आनंदमय जीवन जगण्यासाठी पर्यटनाचाही विचार करावा. रयत शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य मा.विनायकराव पिसे यांनी प्रा.धट यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याचा मागोवा घेत यापुढेही त्यांनी लेखणीच्या माध्यमातून आपलं कार्य अविरतपणे ठेवावं असा उल्लेख केला. तसेच समाज बांधव विठ्ठल मंदिर शनिवार पेठ मिरजचे विश्वस्त मा.विठ्ठलराव माळवादे यांनी सरांच्या आनंदी व सदाबहार व्यक्तिमत्त्वात बाबत संदर्भ देत समाज बांधवासाठी यापुढे काम करावं अशी अपेक्षा व्यक्त केली.

      जयसिंगपूर कॉलेजचे प्रा.डॉ.प्रभाकर माने, विलिंग्डन कॉलेजचे प्रा.मनोहर कोरे, एस के पाटील महाविद्यालयाचे प्रा.डॉ.पी.पी. कांबळे, भिलवडी कॉलेजचे प्रा.विनोदकर, रयत सारथीचे संपादक प्रकाश पाटील व इतर मान्यवरांनी प्रा. धट यांच्याबाबत आपला अनुभव व उदात्त भावना व्यक्त करीत त्यांना आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच गोपाल कुलकर्णी,किरण कोकणे,adv.अनिल कोपर्डे,उद्योजक राजू कोपार्डे त्याचबरोबर अभिषेक धट व पूजा धट यांनी आपल्या वडीलाविषयी आदरभाव व्यक्त केला.

    यावेळी सहकारभुषण एस.के. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वाय.एम.चव्हाण, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील, सेवानिवृत्त प्रा. बी.जी.भोसले, प्रा.डॉ. काळे ,राजेंद्र खोकाटे, रमेशकुमार मिठारे ,डॉ.ए.डी.जाधव व मित्र परिवारांनी धट सरांना शुभेच्छा दिल्या.

 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड.अनिल कोपार्डे, स्वागत-प्रा.डी.जी.धट यांनी केले. उत्तम व सूत्रबद्ध सूत्रसंचालन-माधूरी चोपडे व adv.अनिल कोपार्डे यांनी तर आभार राजेंद्र कोपार्डे यांनी मानले.

    सेवानिवृत्ती निमित्त सुरू असलेल्या या कार्यक्रमात जुन्या आठवणी व भावनाविवश वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला.

     या कार्यक्रमास प्रा.डी.जी.धट यांच्यावर प्रेम करणारे विद्यार्थी, प्राध्यापक,नातेवाईक,समाज बांधव, पत्रकार बंधु व अन्य घटक मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा