Breaking

रविवार, ३ ऑक्टोबर, २०२१

मौजे आगरमधील रस्त्याचे कॉंक्रीटीकरण ; नागरिकांत समाधान

 

मौजे आगर मधील कॉंक्रीट रस्ते


ओंकार पाटील :  शिरोळ प्रतिनिधी


       मौजे आगर येथील प्रभाग क्र १ मधील अंतर्गत रस्ता व रिंगरोडचे कॉंक्रीट रस्त्याचे काम ग्रामपंचायतीच्या फंडातून झाल्याने  चिकोडे, राजपूत, खडके तळावरील नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे या भागातील अंतर्गत  वादामुळे अनेक वर्षे या रस्त्याचे काम रखडले होते. लोकनियक्त सरपंच अमोल चव्हाण  व सदस्य भाऊसो खडके  यांनी  जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील अतिक्रमण काढून समोर उभे राहून कॉंक्रीटचा  रस्ता पूर्ण करून घेतला. येथील भागात चार चाकी वाहन जात नव्हते एखादी व्यक्ती आजारी त्याला स्टेज  चौकापर्यात उचलून आणावे लागत होते. मात्र आता हा रस्ता प्रत्येकाच्या दारापर्यंत झाल्याने वाहतुकीस सोयीस्कर झाल्याने  नागरिकांची समस्या सुटली आहे. 

     त्यामुळे या परिसरात केलेल्या या कामाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा