जयसिंगपूर शहरातील झालेली रस्त्याची दुर्दशा |
करण व्हावळ : जयसिंगपूर प्रतिनिधी
जयसिंगपूर शहरांमधील रस्त्यांची स्थिती अत्यंत खराब झालेली असून नांदणी नाक्यावरील जो मुख्य रस्ता आहे तिथे फार मोठा खड्डा पडलेला आहे. इतर ठिकाणची अवस्था फार चांगली नाही. शहरातील शाहू चौक, शाहूनगर मधील रिक्षा स्टॉप किंवा अवचितनगर मधील रस्ते सगळीकडे रस्त्यांची अशीच स्थिती झालेली दिसून येते.
मुळात नांदणी रोड हा मुख्य रस्ता असून तो वर्दळीचा व दाट वाहतुकीचा आहे. खराब झालेल्या रस्त्यांमुळे दुर्घटना होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर या रस्त्यांची दुरुस्ती केली पाहिजे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे पण याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसतंय.तसेच दुर्घटना घडल्यावर याला जबाबदार कोण ?दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे का? असा आक्रोश नागरिकांमध्ये निर्माण झालेला आहे.
तरी प्रशासनाने रस्त्याचा हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा