Breaking

बुधवार, २० ऑक्टोबर, २०२१

संभाजीपुर ग्रामपंचायत सदस्य पोलिसांच्या ताब्यात ; कुरुंदवाड पोलिसांची मोठी कारवाई

 

अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्यास अटक


प्रविणकुमार माने : उपसंपादक


    कुरुंदवाड पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध गुटखा वाहतूक करताना गौस मोहम्मद अन्वर गवंडी वय 50 रा. संभाजीपूर ता.शिरोळ जि. कोल्हापूर याला सकाळी कुरुंदवाड हेरवाड रस्त्यावरून जाणाऱ्या रोडवरील हॉटेल  मेजवानी समोर पांढर्‍या रंगाच्या मारुती ओमनी मधून तीन लाख 38 हजार रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन पोलिसांनी मोठी कारवाई केली.

    प्राप्त झालेल्या माहितीनुसार 261 2021 कलम 328,188,272,273 यासह अन्न सुरक्षा अधिनियम 2006 कलम 59 प्रमाणे रामचंद्र महादेव ओमासे पोलीस कॉन्स्टेबल यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

       त्यानुसार संशयित आरोपी यास ताब्यात घेण्यात आले आहे त्यांच्याकडे  गुटखा, जर्दा ,पान मसाला व सुगंधी सुपारी व  तंबाखू अशा एकूण तीन लाख 38 हजार रुपयांच्या मुद्देमालासह विक्रीसाठी अवैधरित्या वाहतूक करताना आढळले आहेत.

      पुढील प्रकरणी सखोल तपास सहाय्यक फौजदार उगलमुगले व पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण हे करीत आहेत.

    कुरुंदवाड पोलिसांच्या या मोठ्या कारवाईने अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा