Breaking

बुधवार, २० ऑक्टोबर, २०२१

शिवाजी विद्यापीठ साकारणार अनोखं क्रांतीवन - राजर्षी शाहूंचे वस्तुसंग्रहालय व स्वातंत्र्य सैनिकांच्या नामफलकांचा असणार समावेश

छाया - मालोजीराव माने



 कोल्हापूर : स्वातंत्र्याच्या  अमृतमहोत्सवानमित्त शिवाजी विद्यापीठात अनोखं क्रंतीवन उभारण्यात येणार आहे. ज्यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांचे नामफलक, शाहू शिल्प इत्यादी गोष्टींचा समावेश असणार आहे. विद्यापीठाच्या गेट नंबर ८ मधून एन्ट्री करताना हे क्रांतीवन उभारण्यात येणार आहे. स्वातंत्र्यवीरांचे स्मरण व त्यांना मानवंदना म्हणून विद्यापीठात हे क्रांतीवन उभारण्यात येणार आहे. सर्व नागरिकांसाठी हे क्रांतीवन खुले असणार आहे.

     सोबतच शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रप्रदर्शनी तसेच शाहू महाराज यांच्या वस्तुंचेदेखील संग्रहालय होणार आहे. याच परिसरात एक खुले सभागृह उभारण्यात येणार आहे ज्यामध्ये व वैज्ञानिक प्रयोग प्रदर्शन वसविण्यात येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा