Breaking

शनिवार, ३० ऑक्टोबर, २०२१

*कोल्हापूराच्या कुख्यात दहा गुंडांवर 'मोक्का अंतर्गत कारवाई*


कोल्हापूर शहरात मोक्का अंतर्गत कारवाई


*हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी*


    कोल्हापूर शहर हे नेहमीच येनकेन प्रकारेन प्रकाशझोतात असते. अलीकडील काळात वाढती गुन्हेगारी पोलीस प्रशासन व सर्वसामान्य जनतेची डोकेदुखी बनत चालली आहे. मात्र या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील आरसी गँगमधील दहा गुंडांवर मोका कारवाई करण्यात आलीय. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, वसुली, अपहरण, दरोडासह, बेकायदा शस्त्र कब्जात बाळगून दहशत माजवणाऱ्या आरसी गँगविरोधात कारवाई झालीय. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात दहशत माजविणाऱ्या आरसी गॅंगमधील मोक्यासह १० जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत ( ‘मोक्का’ ) कारवाई करण्यात आली आहे.

   पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या प्रस्तावाला विशेष पोलीस महानिरीक्षकांनी मंजुरी दिली आहे. मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्यामध्ये रवी शिंदे, प्रदीप कदम, संदीप गायकवाड, जावेद सय्यद, सागर जाधव, प्रकाश कांबळे ,अक्षय उर्फ आकाश कदम, अजय माने, योगेश पाटील व विकी माटुंगा यांचा समावेश आहे. गॅंगमधील मोरक्यासह साथीदारांविरोधात कोल्हापूर शहरातील विविध पोलीस ठाण्यात जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

     मोक्काअंतर्गत कारवाईने  कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसेल अशी आशा आहे. कोल्हापूर पोलीस प्रशासनाने केलेल्या या जबर कारवाईने सर्वसामान्य जनतेमध्ये जनतेकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा