Breaking

शनिवार, ३० ऑक्टोबर, २०२१

*करवीरच्या परिते गावाजवळ पुन्हा बिबट्याचे दर्शन ; नागरिक भयग्रस्त*

 

संग्रहित छायाचित्र


*हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी*


  कोल्हापूर : करवीर तालुक्यातील परिते गावाजवळ बुधवारी रात्री दिसलेला बिबट्या शुक्रवारी सकाळी वैरण आणण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा  दिसल्याने भिती वाढली आहे.बिबट्याचा या परिसरात वास्तव्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वनखात्याचे रेस्क्यू पथक पुन्हा परिते येथे येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. भोगावती ते कोल्हापूर रस्ता ओलांडून डोंगराकडे गेलेला बिबट्या त्याच परिसरात असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले आहे. कारण काल सकाळी ढेरे यांच्या शेताकडे वैरणीसाठी दिगंबर सुतार हे गेले होते. त्यावेळी खणी शेजारील ऊसाच्या शेतात कडेच्या सरीत हा बिबट्या बसला असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे ते सरळ घराकडे परतले आहेत.

      परिते व परिसरात बिबट्याचा सातत्याने होणारा दर्शनाने परिसरातील लोक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा