Breaking

गुरुवार, २१ ऑक्टोबर, २०२१

*श्री दत्त महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थी सत्कार व विद्यार्थिनी समुपदेशन कार्यक्रम संपन्न*


दत्त कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

प्रा.अमोल सुंके : अकिवाट प्रतिनिधी


    नवभारत शिक्षण मंडळ सांगली संचलित, श्रीदत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड मध्ये आज एच.एस.सी. 2021 गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व अकरावी विद्यार्थ्यांनीचे समुपदेशन कार्यक्रम संपन्न झाला.

    या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य मा. श्री एम. आर पवार सर यांनी केले. ते बोलत असताना म्हणाले  संस्कृतीचे आणि संस्काराचे  महत्त्व विशद केले, तसेच मोबाईलचे ज्ञान घेण्यापेक्षा पुस्तकी ज्ञान घ्या असे त्यांनी सांगितले.

 या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना नवभारत शिक्षण मंडळ सांगली या संस्थेच्या अनुदानित शाखांमधील गुणवंत विद्यार्थिनींना संस्थेमार्फत दरवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सरोजताई पाटील (माई) यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ बक्षीस योजनेअंतर्गत रोख रुपये पाचशे पारितोषिक देण्यात येत असते, कला वाणिज्य विज्ञान या शाखेत प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आली. विज्ञान विभाग प्रथम क्र. कु. तय्यबा असलम बागवान, वाणिज्य विभाग कु. श्रुती विजय गायकवाड, कला विभाग कु. सौंदर्य दयानंद कांबळे  व श्रद्धा रमेश नाईकवाडे यांना विभागून, प्राचार्य श्री एम.आर. पवार सर यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली. 

     या कार्यक्रमाच्या प्रसंगी समुपदेशन करताना प्रा. कु.पिरजादे  वाय.डी. यांनी 'आरोग्याची काळजी कशी घ्यावी' याचे मार्गदर्शन केले व प्रा. सौ व्ही.सी.साखरे यांनी संत गाडगेबाबांच्या गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा या अभंगातून स्वच्छतेचे महत्त्व सांगितले, त्याचबरोबर प्रा. सौ आर.आर.पाटील मॅडम यांनी 'आकर्षक दिसण्यापेक्षा  व्यक्तिमत्त्व आकर्षक घडवा ' असा संदेश विद्यार्थिनींना दिला.

  या कार्यक्रमाचे आभार प्रा. जे.एम. पाटील यांनी मानले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ खाडे पी.ए. यांनी केले. या कार्यक्रमासाठी गुणवंत विद्यार्थी इयत्ता अकरावी मधील सर्व विद्यार्थिनी व सहकारी शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा