विकास चौगुले श्रावण बाळ वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा करताना |
हिना मुल्ला : विशेष प्रतिनिधी
अकिवाट : गुरुदत्त साखर कारखान्यासमोरील श्रावण बाळ वृद्धाश्रम येथे आज गुरुवार दिनांक २१/१० २०२१ रोजी गुरुदत्त साखर कारखान्याचे कर्तव्यदक्ष व शेतकरी कामगार यांच्या मदतीला धावून जाणारे क्रियाशील अधिकारी मा. विकास चौगुले साहेबांनी आपला 34 वा वाढदिवस केक कापून श्रावण बाळ वृद्धा आश्रमात उत्साहात साजरा केला.
सुरुवातीस त्यांनी निराधार व गोरगरीब वृद्धांचा विचारपूस करून त्यांचा आशीर्वाद घेतला व मुला प्रमाणे त्यांच्या चेहर्यावर समाधान व आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला.यावेळी गुरुदत्त कारखान्याचे डेप्युटी एच.आर. मॅनेजर मा.सी. डी .पाटील आवर्जून उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष सुरेश सासणे यांनी केले. आभार प्रदर्शन विश्वासराव बालीघाटे यांनी केले. यावेळी संस्थेचे संचालिका शोभाताई पानदारे, मल्लाप्पा कोरे व अकिवाट गावचे तंटामुक्त अध्यक्ष आणि वयोवृद्ध निराधार मंडळी उपस्थित होते.
खरं म्हणजे विकास चौगुले यांनी आपला वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला असल्याची चर्चा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा