ग्रापं,सदस्याला मुतारीबाबत जाब विचारताना संग्राम भोसले व इतर युवक |
शशिकांत घाटगे : विशेष प्रतिनिधी
हरोली येथे शनिवारी आठवडा बाजार भरत असल्याने खूप दुरून लोक या ठिकाणी व्यापारासाठी येत असतात. त्यामुळे शेतकरी, व्यापारी, ग्राहक तसेच गावातील नागरिकांसाठी सार्वजनिक मुतारीची सोय करण्याची गरज आहे याबाबतचे निवेदन देण्यात आले होते.
या विषयाच्या अनुषंगाने मुतारीची सोय व्हावी यासाठी नवीन ग्रामपंचायत व कुमार विद्यामंदिर शाळेच्या बाजूला असलेल्या ओढ्यालगत त्याची व्यवस्था करा असे निवेदन यापूर्वी देऊन मागणी केली होती पण आजपर्यंत यांचेकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संबंधित नागरिकांनी दि.३० सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजता ग्रामपंचायत हरोली येथे यासंदर्भात इत्थंभूत माहिती घेण्यासाठी गेले असता ग्रामपंचायत सदस्य हजर नसल्याने मिटींग तहकूब झालेली आहे असे सांगितले.
हा सर्व प्रकार पाहून संतप्त युवकांनी संध्याकाळी ६ वाजता वॉर्डमधील ग्रामपंचायत सदस्य शारूबाई कदम व सागर माने यांच्या दारात धडक दिली.सरपंच गीता कांबळे व उपसरपंच नेमिनाथ चौगुले यांना याठिकाणी बोलावून मुतारी कधी बांधणार असे लेखी लिहून द्या अशी मागणी केली. सदर युवकांनी १० ऑक्टोबरपर्यंत मुतारी न बांधलेस ११ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत समोर मुतारी बांधकामासाठी भीक मांगो आंदोलन करून मुतारी बांधकाम करण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी संग्राम भोसले, गजानन गावडे, अवधूत चव्हाण, वैभव सुतार, सागर माने, अल्ताफ मुजावर,समीर मुजावर,अभिजीत जाधव, अजित जाधव, योगेश कदम,नाना माने,धनाजी जाधव,अरुण कोळी,जुबेर मुजावर,दत्तात्रय गावडे,तुकाराम जाधव,कुबेर माने, कुबेर मोगलाडे,सौरभ सुतार,ओंकार सुतार,दीपक कोळी,अविनाश कुळे,शहाजी भोसले,अनिकेत चव्हाण,आशिष चव्हाण,विजय गुजरे, मोठ्या संख्येने गावातील युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा