मिरजेत घडलेल्या गणेशोत्सव दंगल प्रकरणातील १०६ जणांची सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. यामध्ये तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान,शिवसेना जिल्हाप्रमुख बजरंग पाटील,शहर प्रमुख विकास सूर्यवंशी यांच्यासह १०६ जणांची यामध्ये निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सध्याच्या महा विकास आघाडी सरकारने दंगलीचे खटले बरखास्त करण्याबाबत न्यायालयात अर्ज दाखल केला असल्याने न्यायालयाने हा खटला निकाली काढत संबंधित १०६ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.
२००९ साली गणेशोत्सवादरम्यान शिवसेनेकडून शहरात आक्षेपार्ह विधानासह अफझलखान वधाचा फलक लावल्याने ही दंगल उसळली होती. जवळपास पंधरा दिवस सांगली मिरज शहरांमध्ये कडक संचारबंदी लागू होती.
दरम्यान महा विकास आघाडी सरकार कडून हा खटला बरखास्त करण्याबाबत न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता त्यानुसार जिल्हा सत्र न्यायालयाने हा खटला बरखास्त करून वरील सर्वांचे निर्दोष मुक्तता केली आहे, अशी माहिती बचाव पक्षाच्या वकिलाने बिलकीस बुजरूक यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा