*प्रा.अमोल सुंके : अकिवाट प्रतिनिधी*
श्री विद्यासागर हायस्कूल, अकिवाट येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५३ वी जयंती अत्यंत उत्साहात विविध शैक्षणिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली .
विद्यालयातील हुशार व होतकरू पाच विद्यार्थिनींना शैक्षणिक खर्चासाठी रु.११, ५००/- इतकी मदत प्रदान करण्यात आली . बारामती येथील प्रसिद्ध उद्योजक मा. श्री. शैलेश शहा यांच्या दान राशीतून ही शैक्षणिक मदत वितरीत करण्यात आली .
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री . पी. ए . मगदूम सर यांनी केले . त्यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला . राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्य चळवळीचा, त्यांच्या सत्य व अहिंसा या तत्वावर आधारीत जीवनप्रवासाचा सुरेख पट उपस्थितांसमोर मांडला .
या निमित्ताने शाळेतील विविध बौद्धिक स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला . म .गांधी जयंती निमित्त खास शिक्षकांची चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यातील विजेत्या शिक्षकांना बक्षिसे देवून गौरविण्यात आले .
या कार्यक्रमास उपस्थित असणारे प्राथमिक विद्यामंदिराचे चेअरमन मा.श्री.अनिल चौगुले यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पारितोषिके देण्याकरीता रु .२१००० तर स्थानिक शालेय समितीचे अध्यक्ष मा .श्री.डी.जे. कल्लण्णावर ( कांत गुरुजी ) यांनी रु . १५००० ची ठेव ठेवली . तर समारंभाध्यक्ष मा. प्रा. के. बी. पाटील यांनी विद्यालयाच्या प्रगतीने आपण आनंदीत झालो आहे . अशीच प्रगती सदैव राहो या शुभेच्छा दिल्या व रु .३००० इतकी दानराशी प्रदान केली.माजी मुख्याध्यापक श्री . ए .ए .रायनाडे सरांनी मा मुख्याध्यापक श्री . पी ए मगदूम सरांच्या नेतृत्वात विद्यालयाने शैक्षणिक गुणवत्तेच्या क्षेत्रात केलेल्या चौफेर व दिमाखदार प्रगतीसाठी मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे मनस्वी कौतुक व अभिनंदन केले तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये या विद्यालयाचे यशस्वी विद्यार्थी घडावेत आणि अकिवाट गावचे नाव उज्वल करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली . यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले . कमल भूपाल होसकल्ले बालविकास मंदिराचे चेअरमन मा. श्री.आदिनाथ होसकल्ले यांनी आपल्या व आपल्या परिचयातील विविध संस्था , दानशूर व्यक्ती यांच्या माध्यमातून संकुलासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण सदैव कटीबद्ध असू असे मनोगतात व्यक्त केले . संपूर्ण सोहळ्याचे प्रमुख अतिथी प्रसिद्ध संगीतकार , गीतकार व गायक म्हणून परिचित असणारे श्री . विद्यासागर बडबडे यांनी विद्यालयाच्या नेत्रदीपक कामगिरीने भारावून जावून भावी काळात विद्यालयाच्या प्रगतीसाठी भरघोस मदतीची तयारी दर्शवली .
सदर सोहळ्यामध्ये विविध शैक्षणिक कर्तव्यातून आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सेवक वर्ग यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला . कार्यक्रमासाठी बक्षिसपात्र विद्यार्थ्यांचे पालक , शालेय समितीचे चेअरमन मा. श्री . कमलाकर चौगुले तसेच शालेय समितीचे सदस्य उपस्थित होते . या कार्यक्रमाचे आभार प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका सौ.पी.व्ही.पाटील यांनी मानले.श्री.सुहास बेडक्याळे यांनी उत्तम सूत्रसंचालन केले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा