भिमक्रांती सोशल फाउंडेशनच्या वतीने पुरस्कार सोहळा |
शशिकांत घाटगे :विशेष प्रतिनिधी
हरोली भिमक्रांती सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मा.बाळासाहेब कांबळे यांनी सन 1990 पासून आजतागायत अविरतपणे सामाजिक,राजकीय, शैक्षणिक,आरोग्य,क्रीडा व कोरोनाच्या काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मान्यवरांना भिमक्रांती समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. पुंडलिक भाऊ जाधव होते व प्रमुख पाहुणे शिरोळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. दत्तात्रय बोरीगिड्डे हे होते. विशेष समाज गौरव पुरस्कार मा.सौ स्वातीताई सासणे, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य, पत्रकार मा.दगडू माने मा. संजय भोसले आई वृद्धाश्रम तसेच विविध क्षेत्रात कार्य करणारे महिला, पत्रकार, कोरोना योद्धा, कला, क्रीडा विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या मान्यवरांना भिमक्रांती समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक भिमक्रांती फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रधान सर यांनी केले.
सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थित मान्यवर रमेश शिंद बापू, डांगे साहेब, फिरोज मुजावर, Adv. ममतेश आवळे, रजपूत सर, शशिकांत घाटगे, शिरोळ तालुक्यातील विविध मान्यवर व हरोली ग्रामस्थ हजर होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा