Breaking

सोमवार, ४ ऑक्टोबर, २०२१

*जांभळी विद्यामंदिर शाळा नं १ येथे महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री जयंती निमित्त स्वच्छ शाळा अभियान*

 

जांभळी येथील विद्यार्थ्याचे विविध उपक्रम


 शशिकांत घाटगे : जांभळे प्रतिनिधी 


       जांभळी ता.शिरोळ येथील विद्यामंदिर शाळा नं १ येथे २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची जयंती विविध उपक्रमाद्वारे साजरी करण्यात आली. 

     शिक्षणप्रेमी श्री.शशिकांत घाटगे  यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी जयंतीनिमित्त उत्कृष्ट अशी भाषणे करून शाळेचा परिसर स्वच्छ करणे, झाडांना आळी व सुशोभीकरण करण्यात आले. स्वच्छ भारत स्वच्छ शाळा हा संदेश देऊन विद्यार्थ्यांना त्याचे महत्त्व पटवून देऊन हा उपक्रम शाळेत राबविण्यात आले.

  या कार्यक्रमाचे स्वागत सौ आवळे मॅडम यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शितोळे मॅडम, सौ कुंभार मॅडम सौ व  सौ जगदाळे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले तसेच जवाहर अंगणवाडी क्रमांक 80 च्या शिक्षिका पाटील मॅडम व मदतनीस विद्यार्थी विद्यार्थिनी हजर होते.

      या शालेय पातळीवरील उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा