सामाजिक कार्यकर्ते एजाज मुजावर |
करण व्हावळ : जयसिंगपूर प्रतिनिधी
जयसिंगपूर : एजाज मुजावर हे शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून गेले अनेक वर्षे सेवाभावी वृत्तीने काम करीत पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात व आंदोलनात हीरीरीने सहभागी होत असतात. त्यामुळे पक्षाने त्यांची पक्ष निष्ठा व पक्षा विषयी असलेली तळमळ लक्षात घेऊन 'उप-शहर प्रमुख जयसिंगपूर' पदी निवड झाल्याचे पत्र देण्यात आले आहे.
शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांचे आदेशाने शिवसेना संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या मान्यतेने जिल्हा प्रमुख गुरलीधर जाधव यांच्या सुचनेने करणेत येत आहे. तसेच ही निवड सार्थ करत असतांना शिवसेना प्रमुखांचा ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हा विचार तळागाळात पोहचवावा अशा प्रकारचे अपेक्षा व्यक्त केली आहे.
मुळात एजाज हे अजातशत्रू व तरुण तडफदार व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. पक्षाने त्यांना उपशहर प्रमुख पदी निवड करून मोठी जबाबदारी दिली आहे त्यामुळे पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षाचा ध्येय धोरणे व सामाजिक भान जपत काम करतील अशी अपेक्षा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा