मर्चंट असोसिएशनला निवेदन देताना लालबावटा इंडियन |
मालोजीराव माने : कार्यकारी संपादक
जयसिंगपूर शहरामध्ये तंबाखू उदयोगामध्ये काम करणा-या महिला कामगारांची संख्या मोठया प्रमाणात असुन या उदयोगात काम करीत असतांना शरीरात, नाका-तोंडा बांटे तंबाखूचा घस शरीरात जाऊन त्यांचे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. या सर्व कामगारांना आरोग्याच्या दृष्टीने • कोणत्याही सवलती मिळत नाहीत. सध्याच्या प्रचंड वाढलेल्या महागाईमुळे सध्याच्या पगारात २ वेळच्या जेवणाची व्यवस्था करणे मुश्कील होवून बसले आहे. मुलाबाळांचे शिक्षणापासून ते वंचित होत आहेत.
किमान वेतन कायदयाप्रमाणे या महिला कामगरांना प्रॉव्हिडंट फंड, गॅज्युटी,बाळंतपणाची रजा, आठवडयाची साप्ताहिक सुट्टी, बोनस, इ. सवलती मिळणे आवश्यक आहे. परंतु या सवलती कामगारांना अद्याप मिळत नाहीत. दिवाळीसारखा सण जवळ आला असलेने या सर्व महिला कामगारांच्या हितासाठी खालील मागण्यांची पूर्तता करावी
मागण्या
१. तंबाखू उदयोगातील महिला कामगारांना २१ दिवसाची हक्काची पगारी रजेची रक्कम व पाच राष्ट्रीय सणांच्या सुट्टयांचा पगार हिशोबाने मिळावा.
२. सर्व कामगारांना १२.५ टक्के बोनस मिळावा.
वरील मागण्याची अंमलबजावणी निवेदन मिळालेपासून ८ दिवसात करावी अन्यथा आम्हाला युनियनच्या वतीने तीव्र आंदोलन करावे लागेल अशा प्रकारचा इशारा संघटनेने दिला असल्याची माहिती शिरोळ तालुका लाल बावटा कामगार युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड रघुनाथ देशिंगे यांनी दिला.
कॉम्रेड रघुनाथ देशिंगे,फुलाबाई बेडगे, कॉम्रेड वैशाली बाबर, कॉम्रेड मैमुन मुजावर, कॉम्रेड मंगल चौगुले ,कॉम्रेड चंदा यमगर ,कॉम्रेड सुशीला ठोमके,कॉम्रेड भारती देशिंगे कॉम्रेड लक्ष्मी सावंत यांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा