Breaking

मंगळवार, १९ ऑक्टोबर, २०२१

अखेर प्राध्यापक राजन शिंदे यांच्या निर्घृण खुनाचे गूढ आले समोर, त्यांच्याच अल्पवयीन मुलाने करिअर निवडायच्या वादावरून केला खून

 औरंगाबाद : राज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या प्रा. डॉ. राजन शिंदे यांच्या निर्घृण खुनाचा तपास आठ दिवसांच्या शोध मोहिमेनंतर सोमवारी उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. वडिलांशी वाद झाल्याने डॉ. शिंदे झोपेत असताना त्यांच्याच अल्पवयीन मुलाने डोक्यात डंबेल्सने वार करत, चाकूने गळा, दोन्ही हाताच्या नसा, कान कापल्याची कबुली पोलिसांना दिली.

मयत प्रा.राजन शिंदे


      औरंगाबाद मधील मौलाना आझाद महाविद्यालय इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. राजन हरिभाऊ शिंदे वय, ५१ यांचा गेल्या सोमवारी निर्घृण खून झाल्याने खळबळ उडाली होती.  औरंगाबाद पोलिसांना आठ दिवसांनी या खुनाचे गूढ उकलण्यात यश आले. पत्रकार परिषद घेऊन पोलिसांनी या खुनाचा उलगडा केला.

       पोलिसांच्या म्हणण्यानुसार मयत डॉ. शिंदे व त्यांचा अल्पवयीन मुलगा यांच्यामध्ये वैचारिक मतभेद होते. शालेय करिअर निवडण्यातून त्यांच्यात वाद झाला होता. खुनाच्या घटनेच्या दिवशीही झोपण्यापूर्वी त्यांचात किरकोळ वाद झाला होता. या सर्वाचा राग मनात धरत अल्पवयीन मुलाने वडील झोपेत असताना डोक्यात डंबेल्सने वार करत बेशुद्ध केले. त्यानंतर कीचनमधल्या चाकूने गळा, हाताच्या नसा कापल्या. व कानही कापले. व ती हत्यारे जवळच्या विहिरीत टाकून दिली.





Photo source - lokmat

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा