Breaking

बुधवार, १३ ऑक्टोबर, २०२१

वडगाव येथील बैलांच्या आकर्षण स्पर्धेमध्ये स्वप्नील पाटील यांचा बैल सोन्या अव्वल स्थानी


स्वप्नील पाटील यांचा सोन्या नामक बैल


जीवन आवळे : कोथळी प्रतिनिधी


    वडगाव येथील नवरात्री महालक्ष्मी बाजारमध्ये बैलांच्या आकर्षण स्पर्धेमध्ये दानोळीचे स्वप्नील पाटील  यांचा बैल सोन्या  या स्पर्धेमध्ये अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. 

   या स्पर्धेत सुरुवाती पासूनच सोन्या बैलांने सर्वांना आकर्षित केले होते,  या बैलाची मागणी सुमारे 2 लाख रुपये इतकी झाली असून या सोन्या बैलाला रोज शेंग पेंड, मक्याचा भरडा, गव्हाचे पीठ व  एक लिटर दूध असा परिपूर्ण आहार नित्यनियमाने सोन्याला दिला जातो. सोन्या या  बैलाचा सुमारे  दैनंदिन खर्च 350 ते 400 रुपये चा असून सोन्या बैलाची खरेदी स्वप्नील पाटील यांनी 6 महिन्यांपूर्वी केली होती, त्यावेळेस या बैलाला त्यांनी 90 हजार रुपये देऊन खरेदी केले होती. 6 महिन्यांमध्ये या बैलाची योग्य निगा राखून फक्त 6 महिन्यांमध्ये सोन्या बैलाला 2 लाख पेक्षा अधिकची मागणी यावेळी या बाजारामध्ये झाली. सोन्या बैलाने एखाद्या मुलाप्रमाणे आपल्या पालकाची अर्थात स्वप्नील पाटील यांची प्रतिष्ठा वाढवण्याचे काम केले आहे.

     सध्या सर्वत्र सोन्या बैलाच्या आकर्षणाची चर्चा सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा