Breaking

रविवार, ३१ ऑक्टोबर, २०२१

प्लॅस्टिमुक्त परिसरासाठी शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कटिबद्ध व कार्य कौतुकास्पद : महापौर मा.दिग्विजय सुर्यवंशी

 

महापौर दिग्विजय सुर्यवंशी मार्गदर्शन करताना


प्रा.डॉ.प्रभाकर माने :  मुख्य संपादक*


       राष्ट्रीय सेवा योजनेच्या व नेहरू युवा केंद्राच्या वतीने २९ ऑक्टोबर २०२१ रोजी प्लॅस्टिकमुक्त सांगली शहर व  परिसरासाठी सुरू असलेल्या अभियानामध्ये सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे तरुण व तडफदार महापौर मा.दिग्विजय सुर्यवंशी यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सुरू असलेल्या प्लॅस्टिक संकलित परिसराला भेट दिली.

       सविस्तर माहिती अशी की, शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक मा.प्रा.अभय जायभाये यांचे मार्गदर्शन व सांगली जिल्हा समन्वयक प्रा.पोपटराव माळी यांच्या नेतृत्वाखाली सांगली शहरात जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक विद्यार्थी व कार्यक्रम अधिकारी यांच्या माध्यमातून 'माझी वसुंधरा व स्वच्छ भारत' (क्लीन इंडिया) या अभियानांतर्गत प्लॅस्टिक संकलित करण्याचा विधायक उपक्रम सुरु केला आहे. याप्रसंगी महापौर मा.दिग्विजय सुर्यवंशी यांनी सदर स्थळी भेट देऊन  विद्यार्थ्यांना राष्ट्र निर्माण कार्यात सेवाभावी वृत्तीने करीत असलेल्या कार्याला शुभेच्छा देऊन मी स्वतः कस्तुरबा वालचंद कॉलेज,सांगलीचा राष्ट्रीय सेवा योजनेचा माजी स्वयंसेवक विद्यार्थी असून लोकसेवा करण्याची सुरुवात खऱ्या अर्थाने राष्ट्रीय सेवा योजनेपासून सुरू झाली. आजचे हा विधायक उपक्रम पाहून तत्कालीन काळातील केलेले श्रमदान व प्रबोधन रॅलीच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत असे म्हणत त्यांनी त्या काळातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्याचा सकारात्मक अनुभव विद्यार्थ्यांसमोर कथित केला. सद्य परिस्थिती सुरू असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेचे  'माझं गाव कोरोनामुक्त गाव' या अभियानाचे व प्लॅस्टिक संकलन उपक्रमाचे मनस्वी कौतुक करून विद्यार्थ्यांशी उत्तम संवाद साधून शुभेच्छा दिल्या.

     या अभियानात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्याकडून सार्वजनिक जागेवरील जवळपास ४०० ते ४५० किलो ग्रॅम प्लॅस्टिक संकलित करण्यात आले. सदर उपक्रमामध्ये प्रा.पोपटराव माळी,नेहरू युवा केंद्राच्या प्रमुख सौ.अरुणा कचुरे, V P मॅनेजमेंट कॉलेज सांगलीचे कार्यक्रम अधिकारी प्रा. कु. रजनी शिंदे,प्रा.गोडबोले, पतंगराव कदम कॉलेज सांगलीवाडीचे प्रा.आवळे, विलिंग्डन महाविद्यालयाचे प्रा.गडलिंग,प्रा.हराळे, जयसिंगपूर कॉलेजचे डॉ.प्रभाकर माने व विविध महाविद्यालयातील स्वयंसेवक विद्यार्थी या स्वच्छ भारत अभियानामध्ये सक्रिय सहभाग नोंदविला.

        सांगली- मिरज व  कुपवाड महानगरपालिकेच्या सर्व घटकाकडून राष्ट्रीय सेवा योजनेचे कौतुक केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा