Breaking

बुधवार, ६ ऑक्टोबर, २०२१

*घटस्थापनेपासून श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्त मंदिर दर्शनासाठी उद्या खुले होणार*


श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थान


*प्रा.चिदानंद अळोळी : नृसिंहवाडी प्रतिनिधी*


 नृसिंहवाडी : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व नियम व अटींचे पालन करून श्री दत्त मंदिर दर्शनास खुले करण्यात येणार आहे अशी माहिती श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थान अध्यक्ष मेघंशाम पुजारी, सचिव महादेव पुजारी यांनी दिले.

    महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे घटस्थापनेपासून उघणार म्हणून जाहीर केले होते .राज्य शासनाच्या आदेशानुसार कोरोना काळात मंदिर गेली दीड वर्षे दर्शनास बंद होते.पण आता ती गुरुवार पासून दर्शनास खुले होतील.

       श्री दत्त मंदिर खुले होत असल्याने दत्त देव संस्थानमार्फत सर्व तयारी सूरु आहे. यामध्ये मंदिर परिसर स्वछता, रंगरंगोटी , शासन नियमानुसार दर्शन व्यवस्था, अन्नछत्र ,महाप्रसाद व्यवस्था,पिण्याचे पाणी इत्यादी सुविधा देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा