Photo source- ANI |
मालोजीराव माने - कार्यकारी संपादक
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात प्रभावशाली १०० व्यक्तींच्या यादीमध्ये स्थान मिळवले आहे( Time’s 100 Most Influential), मात्र नकारात्मक कारणांसाठी. त्यांचा उल्लेख "भारताला धर्मनिरपेक्षतेपासून दूर लोटणारे आणि हिंदू राष्ट्रवादाकडे ढकलणारे नेते" असा करण्यात आला आहे.
अमेरिकेमधील 'टाइम' या जगप्रसिद्ध मॅगझिनच्या '२०२१ मधील सर्वात प्रभावशाली १०० व्यक्तींच्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समावेश करण्यात आलाय. मात्र मोदींचा समावेश हा नकारात्मक कारणांसाठी करण्यात आलेला आहे.
तसेच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील राजवटीमध्ये 'भारतामधील मुस्लिमांच्या अधिकारांमध्ये कपात करण्यात आली आहे' असा आरोपही या लेखात करण्यात आला आहे. तसेच कोरोना परिस्थितीही व्यवस्थित हाताळता आली नाही, सरकारने जाहीर केलेले कोरोनामुळे मृत्यू झालेले आकडे हे सत्य परिस्थितीपेक्षा खूपच कमी असल्याचे बोलले जात आहे.
मोदींचा उल्लेख या यादीमध्ये ज्या पार्श्वभूमीवर करण्यात आला आहे तो उल्लेख मान वाढवणारा नसून देशाच्या प्रतिमेसंदर्भात शंका घेणार आहे.
जगातील सर्वात मोठा धर्मनिरपेक्ष देश म्हणून ओळख असलेल्या भारत देशाला एकधार्मिक ओळख करू पाहणे हे देशहिताचे नाही, असे मतही डाव्या संघटने कडून होत आहे.
टाइम्स च्या या यादीत जगप्रसिद्ध १०० व्यक्तींमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया चे संस्थापक आदर पूनावला यांचाही समावेश केला गेला आहे. ममता बॅनर्जी यांचा उल्लेख 'रस्त्यावरील लढवैया नेत्या ' असा केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा