चरण कांबळे यांचा सत्कार करताना |
हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी
माणगाव ता .हातकणंगले येथे भारतीय बौध्द महासभा शाखा कोल्हापुर यांचा समाजातील प्रत्येक विषयानुसार 24 शिबिर घेण्यात येतात. त्यामधील एक श्राम्णेर शिबिर हे दि.5/10 2021ते 15/10/2021 या कालावधीसाठी आयोजित करण्यात आले होते. या महत्त्वपूर्ण धार्मिक शिबिरासाठी आमच्या मंडळाचे मार्गदर्शक आयु. चरण कांबळे यांनी सक्रिय सहभाग घेतला. बौद्ध धम्मासाठी केलेल्या विशेष सहभागाबाबत मंडळाच्यावतीने त्यांचा सत्कार करून यापुढे बौद्ध धम्माचा समाजामध्ये विकास, प्रचार व प्रसार करण्यास त्यांना मनोभावे शुभेच्छा देण्यात आल्या.
शुभेच्छा देण्यासाठी भारतीय बौध्द महासभेचे शिरोळ तालुका अध्यक्ष आयु. संतोष भूयेकर सर, शिवसेना शाखा प्रमुख मा.अरुण नल्ला, शिरोळ तालुका युवक कॉंग्रेस उपाध्यक्ष असलम मुळे, आर्यँस सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य हे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा