पुणे : दौंड - प्रसूतीवेळी येणाऱ्या कळांमुळे महिलेने आरडाओरड केली म्हणून डॉक्टरने त्या गरोदर महिलेस अमानुष मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पुणे (दौंड) यवत येथील जयवंत हॉस्पिटल मधे ही घटना घडली आहे. संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल केला गेला आहे.
संग्रहित |
असा प्रकार घडला - प्रसूती कळा येत असल्याने पूजा गोरख दळवी नामक महिला पुणे (दौंड) यवत येथील जयवंत हॉस्पिटल मधे दाखल झाल्या होत्या. यावेळी प्रसूती कळंमुळे दुखू लागल्याने या महिला ओरडू लागल्या, तेव्हा का ओरडत आहेस म्हणून डॉक्टरने या महिलेच्या तोंड, हात, ओठ, मांडीवर चापटी व बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीमुळे महिलेच्या तोंडावर व शरीरावर काळे, निळे वळ उठले आहेत.
घटनेची सारवासारव करताना डॉक्टर निर्लज्जपणे म्हणतो की, मी मारल्यामुळे तू कशी ओरडायची थांबलीस.
पोलिसांनी डॉक्टरला योग्य धडा शिकवू असे म्हणले आहे, समाज माध्यमातूनही डॉक्टर विरोधात संताप व्यक्त होत आहे.
Photo source - dreamstime.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा