रोटरी क्लब ऑफ शिरोळ |
गीता माने : सहसंपादक
शिरोळ : आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये कमी वेळेत चांगल्या प्रतिचे विविध पदार्थ कसे तयार करता येतील, याबाबत महिलांना मिळालेले मार्गदर्शन निश्चितच संग्रही ठरणार आहे. रोटरी क्लब ऑफ शिरोळने महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन मंजुषा धैर्यशील पाटील यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ शिरोळ व आयएफबी मायक्रोव्हेव यांच्या संयुक्त विद्यमाने शिरोळ परिसरातील महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कुकींग क्लासेसला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
रोटरीचे अध्यक्ष दिपक ढवळे यांनी प्रास्ताविक केले. तर स्वागत नितीन शेट्टी यांनी केले .दरम्यान, जागतिक पोलिओ निर्मुलन व अन्नदान याबाबत जागृती करण्यासाठी पोस्टरव्दारे प्रबोधन करण्यात आले.
आयएफबी मायक्रोव्हेव कंपनीचे उदय पाटील, एको इलेक्ट्रॉनिक्सचे सुमित पाटील, फिनिक्स इलेक्ट्रॉनिक्स शिरोळचे सुहास माने यांचे सहकार्य लाभले.यावेळी धैर्यशील पाटील, अतुल टारे, सचिन देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ शिरोळच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा