संग्रहित छायाचित्र |
शिरोळ प्रतिनिधी,
श्री दत्त मंदिर नृसिंहवाडी येथे दत्त दर्शनासाठी विजापुर येथुन आलेले भाविक सुकन्या निमनबर्गे (20) सौजन्य निमनबर्गे (21) कृष्णा नदीत स्नान करीत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागलें हे त्यांच्या नातेवाईकांना लक्षात येताच आरडाओरडा करू लागले, त्याच क्षणी कोणताही विलंब न करता नावेत उपस्थित असणारे युवा नावाडी *भूषण गावडे* व *काशीनाथ लोणार* हे प्रसंगावधान ओळखून नावेतून उडी टाकून बुडणाऱ्या भाविकांना वाचविले, व त्यांना जीवनदान दिले.
रविवार ची सुट्टी असल्याने श्री दत्त दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा,कोकण व विविध भागांतून येत असतात अशा वेळी औरवाड चे नावाडी अरुण गावडे व संजय गावडे या प्रसंगवेळी सतर्क राहून भाविकांची मदत करत असतात पण आता त्याचा मुलगा भूषण सुद्धा या मदतीस नेहमी तत्पर असतो व भाविकांच्या बचावकार्यस नेहमी सतर्क असतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा