आरोपी |
पाच लाखांच्या खंडणीसाठी पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील व्यापार्याला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देणार्या सातारा येथील संशयिताला वडगाव पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी सापळा रचून बेड्या ठोकल्या. कमलाकर यशवंत मुळे (वय 33, रा. मंगळवार पेठ, सातारा, सध्या हनुमान मंदिरजवळ, वडगाव) असे त्याचे नाव आहे. थंड डोक्याने खंडणीसाठी कट रचून खंडणीखोराने व्यापारी कुटुंबाला हैराण करून सोडले होते.
संशयिताकडे उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात त्याने गुन्हे केले असावेत, असा संशय पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांनी व्यक्त केला. उद्या त्यास न्यायालयात हजर करण्यात येत आहे.
संशयित व्यापार्याकडे यापूर्वी तो चालक म्हणून कामाला होता. लुल्ला नावाने तो परिचित होता. संशयास्पद वर्तनामुळे त्याला कमी करण्यात आले होते. मात्र व्यापारी व अन्य मंडळींच्या आर्थिक उलाढालीची त्याला माहिती होती. चार दिवसांपूर्वी त्याने व्यापार्याशी संपर्क साधला. पाच लाखांच्या खंडणीची मागणी करीत पूर्तता न केल्यास अश्लील फोटो व्हायरल करून कुटुंबीयांच्या बदनामीची धमकी दिली. या प्रकारामुळे भेदरलेल्या व्यापार्याने मित्रांची मदत घेतली. पोलिस निरीक्षक घोळवे यांच्याशी संपर्क साधला व फिर्याद दाखल केली. पोलिसांनी सापळा रचूनही संशयित दाद लागू देत नव्हता. अखेर इस्लामपूर-आष्टा रोडवर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा