एकात्मिक बालविकास प्रकल्प शिरोळ -2 अंतर्गत तेरवाड गावमध्ये अंगणवाडी तील कुपोषित मुलांसाठी HOME - VCDC चे आज दिनांक 26/10/2021 रोजी तेरवाड गावच्या सरपंच सौ लक्ष्मी परशुराम तराळ वहीणी यांच्या हस्ते व श्रीमती शोभा गोविंद आवळे ग्रामपंचायत सदस्य तेरवाड , पर्यवेक्षिका श्रीमती पी पी तिकोटी मँडम व सी एच ओ वंदना गिरमल मँडम यांच्या उपस्थितीत करण्यात आला, या प्रसंगी कुपोषित मुलांची वाढ होण्यासाठी कशा पद्धतीने काम केले पाहिजे कोणते पोषण आहार मुलांना दिले पाहिजे या बद्दल मार्गदर्शन श्रीमती पी. पी.तिकोटी मँडम व सी.एच. ओ.वंदना गिरमल मँडम यांनी पालकांना व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना करण्यात आले ,
कै गोविंद बंडू आवळे सोशल फौंडेशन तेरवाड यांच्या उपाध्यक्ष सौ सारिका उमेश आवळे यांच्या वतीने अंगणवाडी क्रमांक 193,194,399,400 या अंगणवाडीस प्रोटीन पावडर व कँल्शिअम औषध देण्यात आले तसेच तेरवाड गावच्या सरपंच सौ लक्ष्मी परशुराम तराळ वहीणी यांनी देखील कुपोषित मुलांना उघडलेली अंडी व केळी यांचे वाटप केले,
गावातील सरपंच, सदस्य त्याच बरोबर सामाजिक कार्यकर्ते यांनी अशा पद्धतीने मदत करावी जेणेकरून आपले गाव हे कुपोषित मुक्त व्हावे असे प्रतिपादन मँडम यांनी केले ,या कार्यक्रमाची प्रस्तावनाअंगणवाडी सेविका सौ सुरेखा हिरालाल कांबळे यांनी तर आभार अंगणवाडी सेविका सौ वासंती रावसाहेब कांबळे यांनी केले.
अशाच पद्धतीने गावातील प्रत्येक पुढार्यांनी कुपोषित मुलांना मदत करावी अशी मागणीही पालकांमधून करण्यात आली व कार्यक्रमाचे कौतुक करण्यात आले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा