Breaking

मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१

अकिवाट येथे व्हॉट्सॲप ग्रुपचा असाही उपयोग, ग्रुप अडमीन रमेशकुमार मिठारे यांच्या एका हाकेतून कॅन्सरग्रस्त बालकाच्या उपचारासाठी सदस्यांनी जमविले तब्बल २७ हजार रुपये.

 

अकिवाट वार्ता चे ग्रुप सदस्य मदत प्रदान करताना


आदिनाथ पाटील : अकिवाट प्रतिनिधी

      आजचं युग तंत्रज्ञानाचं. पण तंत्रज्ञानाच्या अति आहारी जाऊन आजची तरुण पिढी वाया जात आहे. म्हणून काही लोग तंत्रज्ञानाला शाप ही म्हणतात आणि काही लोक वरदान.

     पण हा 'शाप की वरदान?' हे आपण त्याचा उपयोग कसा करून घेतो त्याच्या वरून ठरतं, हे ही आपल्याला मनोमनी लक्षात आलयं आणि याचाच प्रत्यय अकिवाट येथे आला.



     शिरोळ तालुक्यातील या गावात 'अकिवाट वार्ता' या whatsapp ग्रुपच्या सदस्यांनी मिळून एका तीन वर्षीय कॅन्सरग्रस्त मुलाला 27 हजार रुपयांची रोख रक्कम मदत म्हणून देऊ केली. सैनिक टाकळी येथील पृथ्वीराज कोळी या तीन वर्षीय मुलाला डोळ्याच्या कॅन्सरचं निदान झालं आणि कौटुंबिक परिस्थिती गरीब असल्यामुळे अनेक लोक त्याला मदत करण्यासाठी पूढे सरसावले. त्यात 'अकिवाट वार्ता' whatsapp ग्रुपने ही वाटा उचलला. एडमिन रामेशकुमार मिठारे आणि आदिनाथ शिरगावे यांच्या पुढाकाराने काहीच दिवसात सर्व सदस्यांनी मिळून ही रक्कम जमा करून पृथ्वीराजला देऊ केलं.

      मदत देते प्रसंगी प्रा.तानाजी हुजरे, जवाहर कारखान्याचे संचालक संजय कोथळी, ॲड.सुशांत कुंभार, शिवसेनेचे कार्यकर्ते उत्तमसिंग रजपुत, शिवाजी गायकवाड,बंडू पाणदारे(फोटोग्राफर), विद्यासागर रायनाडे, रावसाहेब कुंभार, दारासिंग रजपूत , "अकिवाट वार्ता" गुप्रॲडमिन रमेशकुमार मिठारे व अमर पाटील उपस्थित होते. कोळी कुटूंबियांना उपस्थित अनुपस्थित सर्व दातारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा