- इतर राज्यात परतीच्या पावसाने कांदा पिकाचे नुकसान
- त्यामुळे महाराष्टातील कांद्याला प्रचंड मागणी
- नवीन कांदा तयार होईपर्यंत ( दिवाळीपर्यंत) कांद्याचे भाव वाढतच जाणार.
संग्रहित |
परतीचा पाऊस व खराब वातावरण यामुळे कांदा पिकाचे बरेच नुकसान झाले आहे, त्यातच इतर राज्याकडून महाराष्टातील साठवलेल्या कांद्याला मागणी वाढल्याने बाजारात कांद्याचे भावही वाढत आहेत. सध्या बाजारात कांद्याला किलोमागे ५० ते ६० रुपये असा दर आहे. आणि तो अजुन वाढण्याची शक्यता आहे.
व्यापाऱ्यांच्या मते पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना नवीन कांदा पेरणी करावी लागली आहे. नवीन कांदा किमान नोव्हेंबर अखेर मधे तयार होण्याची शक्यता असल्याने, दिवाळीपर्यंत तरी कांद्याचे भाव अशाच प्रकारे वाढत राहतील.
Photo source - patrika.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा