Breaking

बुधवार, २७ ऑक्टोबर, २०२१

शिवाजी विद्यापीठ - B.A.B.Ed & M.Sc. Env. Sci. चे निकाल घोषित. - मा.गजानन पळसे,प्र.संचालक

संग्रहित छायाचित्र



 शिवाजी विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील मार्च/ एप्रिल २०२१ च्या परीक्षा दि.१० ऑगस्ट २०२१ पासून ऑनलाईन पध्दतीने सुरळीतपणे सुरु झाल्या दि.२८ सप्टेंबर २०२१ पासून पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षांच्या परीक्षाना प्रारंभ झाला. आज दि. २७ ऑक्टोबर २०२१ रोजी एम. एस्सी. अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा सुरळीतपणे पार पडल्या आजच्या परीक्षेसाठी २५ विद्यार्थ्यापैकी २१ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने परीक्षा दिली. ऑनलाईन परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचण उद्भवू नये यासाठी तांत्रिक अडचणीचे निराकरण करणेसाठी परीक्षा विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच सॉफ्टवेअर पुरवठादार कंपनीची यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आली होती.

      आज दि. २७ ऑक्टोबर २०२१ रोजी M.Sc. (Environmental Science) Sem. 1 & 2, B.A.B.Ed. Sem. 3 & 4 अशा एकुण ०४ परीक्षांचे निकाल घोषित करण्यात आले तसेच आजपर्यंत एकुण ५२९ अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल घोषित करण्यात आले आहेत.


तसेच शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षासाठी एम फिल / पीएच डी साठीची प्रवेश परीक्षेचे आयोजन आज दि.२६ २७ व २८ ऑक्टोबर २०२१ रोजी श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर, श्रीमती मथुवाई गरवार कन्या महाविद्यालय, सांगली आणि यशवंतराव चकाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स, सातारा या तीन परीक्षा केंद्रावर करण्यात आले होते. आज दि. २७ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या परीक्षेसाठी एकूण १९०४ विद्यार्थ्यांपैकी १२०५ इतक्या विद्याथ्र्यांनी एम. फिल/ पीएच.डी. प्रवेश परीक्षा दिली. आज Electronics, Business Management, Marathi, Electronics and Telecommunication Engg., Environmental Science, Computer Science, Mathematics, Russian Language. Geography, Micro-biology, Statistics, Mechanical Engg., Psychology, Economics, Zoology, Agro-Chemical and Pest Management या विषयाच्या परीक्षा घेण्यात आल्या.

  B  एम. फिल / पॉएच.डॉ. साठीची प्रवेश परीक्षेमधील प्रश्नपत्रिकेबाबत काही शंका / त्रूटी/आक्षेप असल्यास त्याबाबतची तक्रार संबंधित विद्यार्थ्यांनी दि. २९ ऑक्टोबर २०२१ रोजी सायं.६.०० पर्यंत appointment.a@unishivaji.ac.in या ईमेलद्वारे पालवून द्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्री गजानन पळसे यांनी दिली

1 टिप्पणी: