Breaking

शनिवार, २३ ऑक्टोबर, २०२१

हनीट्रॅपमध्ये अडकले कोल्हापुरातील व्यापारी; तरुणीसह टोळक्याने चित्रनगरी परिसरात नेऊन लुटले

 

संग्रहित छायाचित्र


    कोल्हापूर ; जिल्ह्यात हनीट्रॅप चे अनेक प्रकरणे समोर येत आहेत, यात काहींनी आत्महत्या देखील केलं आहे. यातच आता कोल्हापूर शहरात हे हनीट्रॅप चं जाळं पसरताना दिसत आहे. शहरातील एका व्यापाऱ्याला तरुणी व तिच्या साथीदारांनी लुटल्याची घटना घडली आहे.

    सुरुवातीला फोन वरून अनोळखी बोलणं मग फेसबूक व्हॉट्सॲप वर चॅटिंग द्वारे तरुणीने त्या व्यापाऱ्याला आपल्या जाळ्यात ओढलं. बेधुंद झालेल्या व्यापाऱ्याला तिने कोल्हापुरातील  चित्रनगरी या परिसरातील निर्जन ठिकाणी  सायंकाळी भेटायला बोलावले. भेटल्यावर बोलणं सुरु होताच तेथेच लपलेले तिचे साथीदार तेथे येतात व आमच्या बहिणीला निर्जन ठिकाणी बोलावतोस का ?, तिला फसवतोस का ? असा जाब विचारत त्याला बेदम मारहाण करतात. बदनामीची भीती दाखवत रोख रक्कम, किमती दागिने काढून घेऊन तरुणीसह साथीदारही तेथून पसार होतात.

     कोल्हापुरातल्या चित्रनगरी, मोरेवाडी, शेंडापार्कसह उजळाईवाडी उड्डाणपूल परिसरात सराईत ‘हनीट्रॅप’ टोळीने महिन्याभरात जवळपास दहा व्यक्तींना फसवत धुलाई करत त्यांना लुटले आहे. त्यात दोन बड्या व्यावसायिकांसह नोकरदार, तरुणांचा समावेश आहे. लक्ष्मीपुरीतल्या तरुण व्यापार्‍याला ‘दीपा’ नावाच्या तरुणीने साथिदारांच्या सहाय्याने ‘हनीट्रॅप’ मध्ये गुंतवून 90 हजाराला चुना लावला आहे.

     पोलिसांकडून सर्व व्यक्तींना आवाहन आहे की, अनोळखी अशा कोणत्याच व्यक्तीशी सोशल मीडिया किंवा इतर माध्यमावर मैत्री करताना खबरदारी घ्यावी. जर काही संशयास्पद वाटल्यास लगेचच पोलिसांशी संपर्क साधावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा