Breaking

सोमवार, २५ ऑक्टोबर, २०२१

भारत पाकिस्तानकडून मॅच हरल्यानंतर काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण

Photo source - TOI



 रविवारी झालेल्या भारत - पाकिस्तान क्रिकेट सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर पंजाबमध्ये काही काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. 

     पंजाबच्या भाई गुरुदास इन्स्टिट्यूट ऑफ इंजनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी व रयत बहराट विद्यापीठ या विद्यालयाच्या वसतिगृहात काही विद्यार्थ्यांनी काश्मिरी विद्यार्थ्यांवर शिवीगाळ करत हल्ला केल्याचा दावा जम्मू आणि काश्मीर विद्यार्थी संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते नसीर खुहेमी यांनी केला आहे. या मारहाणीचे काही व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत.

  



काही स्थानिक व पंजाबी विद्यार्थ्यांनी त्या काश्मिरी विद्यार्थ्यांना वाचवले, अन्यथा अनर्थ झाला असता. हल्ला करणारे विद्यार्थी हे हरयाणा चे आहेत. पंजाब पोलिसांनी तेथे शिकणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्यांना संरक्षण दिले पाहिजे अशी मागणीही विद्यार्थी नेते खूहेमी यांनी केली. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा