सावधान! दिवाळीनिमित्त आज काल आर्थिक फसवणूक करणारे फेक मेसेजेस/संदेश जोमाने पसरत आहेत.
✍🏼 योगेश घाडेकर : प्रमुख प्रतिनिधी
ऑनलाइन सुविधा निर्माण झाल्यापासून ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाणही वाढत आहे. काही वस्तूंच्या आमिषाला भुलल्याने आपण कोणत्याही लिंकवर क्लिक करतो आपले बँक तपशील पाठवतो, व आपण आर्थिक फसवणुकीचे शिकार बनतो. सरकारी यंत्रणेने तसेच आणि वारंवार मीडियामध्ये याबद्दल जागृती करून देखील लोक स्वतःची आर्थिक फसवणूक करून घेत आहे. आता या वेळीही दिवाळीच्या उत्सवामध्ये हे चुकीचे आणि आर्थिक फसवणूक करणारे खोटे संदेश, खोट्या लिंक सक्रिय होताना दिसत आहे.
त्यातील काही सामान्य प्रकार खालीलप्रमाणे -
बंपर डिस्काउंट मिळेल त्यासाठी या लिंक वर क्लिक करा. यामध्ये एखादी वस्तू - सेवा मोफत किंवा भरपूर सवलतीमध्ये मिळतील अशी खोटी लिंक पसरवली जाते. यामध्ये प्रथम थोडे पैसे भरण्यास सांगून गुन्हेगार बनावट वस्तू देतात तर पैसे घेऊन कधीकधी गायब होतात.
सरकारी यंत्रणेचा मेसेज अशा नावाखाली अनेकदा तुम्हाला तुमची वैयक्तिक किंवा बँकेची संबंधित माहिती देण्यास सांगितले जाते, यावर विश्वास ठेऊ नका!
आर्थिक फसवणूक बद्दल तक्रार एक नजर नवीनच प्रकार सायबर गुन्हेगार वापरत आहेत. यामध्ये तुम्हाला तुमच्या एटीएम मधील पैसे काढून घेतले आहेत असे सांगितले जाते त्याविषयी तक्रार करण्यासाठी एखादा फोन कॉल येतो किंवा एखाद्या बनावट खोट्या लिंक वर तक्रार नोंदवण्यासाठी सांगितले जाते.
खोट्या जॉब ऑफर्स च्या लिंक किंवा कॉल कोरोनामुळे अनेक तरुण बेरोजगार आहेत त्यांना असे फेक मेसेज किंवा फेक कॉल सर्रास येत असतात. थोडे पैसे भरून जॉब मिळून जाईल असे खोटे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक केली जाते. कधीही कोणतीही नामांकित कंपनी पैसे भरून नोकरी लावत नाही.
अशा प्रकारे वरील सर्व प्रकारांमध्ये एक गोष्ट कायम आहे ती म्हणजे असे खोटे बनावट मेसेजेस लिंक किंवा फोन कॉल वर विश्वास ठेवू नका. ते त्वरित ओपन/रिसिव्ह न करता डिलीट करा.
नाही तर दिवाळी महागात पडू शकते!
दिवाळीच्या सर्वांना असंख्य शुभेच्छा!!!
जय हिंद!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा