|
मालोजीराव माने : कार्यकारी संपादक
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील नांदणी येथे ८ महिन्याच्या बाळाच्या घशात लिंबू अडकून दुर्देवी मृत्यू झाला आहे. मयुरेश विलास पळसे नामक ८ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याने घडलेल्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ही घटना सकाळी ९.००च्या सुमारास घडली या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सकाळी नऊच्या सुमारास बाळाची आई जेवण करत असताना तसेच बाळाचे वडील विशाल पळसे घराच्या दारात बसले होते या दरम्यान मंगेश खेळत असताना घरात पडलेल्या लिंबू तोंडात घातला असता तो थेट घशात अडकला बाळ अस्वस्थ झालेले पाहून व लिंबू घशात अडकलाच्या पालकांच्या निदर्शनास येताच तात्काळ गावातील जवळच्या दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी जयसिंगपूर मध्ये खाजगी रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले.मात्र खासगी रुग्णालयात दाखल करताच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर पसरला असून परिसरात लोकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा