मिरजेत सापडला दुर्मीळ खापर खवल्या साप |
जीवन आवळे : विशेष प्रतिनिधी
मिरजमध्ये नागरी वस्तीत दुर्मिळ खापर खवल्या साप आढळून आला. तात्काळ सर्प मित्रांनी सुरक्षित बचाव कार्य करत त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
अनिल काशिनाथ कंकाळी यांच्या खाडे हायस्कूल शेजारी घरच्या बाहेर साप आढळून आल्याची माहिती सर्प मित्र महादेव भोसले यांना दिली.मिळालेली एक फूट लांबीचा हा दुर्मिळ खापर खवल्या जातीचा साप असल्याचे सर्पमित्र महादेव भोसले, बापू भाजीवाले ,सचिन पाटील व आकाश शिंदे यांनी सुरक्षित बचाव कार्य करून नैसर्गिक अधिवासात सोडून दिला. हा साप बिनविषारी असून कर्नाटक,गोवा व पश्चिम महाराष्ट्र या भागात आढळून येत असल्याची माहिती दिली. तसेच याचे खाद्य गांडूळ असून उष्ण आणि दमट हवामानात त्याचा वावर जास्त असतो. मिरज तालुक्यात तीन ते चार वर्षानंतर हा साप पहिल्यांदा आढळून आल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली आहे. हा साप मांडूळ सारखा दिसत असल्याने तू मांडूळ साप आहे अशा प्रकारचा गैरसमज लोकांचा होता. मात्र सर्पमित्र महादेव भोसले यांनी याबाबत इथंभूत व वास्तव माहिती दिली.
मिरज शहर व परिसरात या सापाची चर्चा मात्र जोरदार रंगली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा