Breaking

सोमवार, २९ नोव्हेंबर, २०२१

*जयसिंगपूर कॉलेजमधील राष्ट्रीय नवमतदार जनजागृती व नोंदणी मोहीम कौतुकास्पद ; शिरोळ तहसीलदार कार्यालयाचे विशेष सहकार्य*

 

जयसिंगपूर कॉलेजमध्ये नवमतदार जनजागृती करताना


गीता माने : सहसंपादक


जयसिंगपूर कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर,२०२१ या कालावधीसाठी नव मतदार जागृती व नोंदणी अभियान सुरू असून यासाठी महाविद्यालयात नवमतदार नोंदणीसाठी विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

       स्विप(SWEEP) कार्यक्रमांतर्गत शासनाच्या नियमांना अधीन राहून तसेच मा.तहसीलदार डॉ.सौ.अपर्णा मोरे-धुमाळ यांच्या मार्गदर्शनानुसार, शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक प्रा.अभय जायभाये यांनी केलेल्या आवाहनानुसार व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरत मांजरे यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने पहिल्या टप्प्यात दि.१२ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे व कोरोना काळात दत्तक घेतलेल्या गावातील नवमतदाराची जनजागृती केली होती.

नवमतदार जनजागृती व नोंदणी पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयात बैठक

      मात्र दुसऱ्या टप्प्यात मा. तहसीलदार कार्यालयाकडून दि. १८ नोव्हेंबर,२०२१ रोजी नवमतदार जनजागृती व नोंदणी या विषयी चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. मा.तहसीलदार डॉ.सौ.अपर्णा मोरे - धुमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नायब तहसीलदार मा.प्रकाश आरगे, निवडणूक महसूल सहाय्यक मा.संदीपान हंगे,डाटा ऑपरेटर सुजय हलवाई  व तहसील कार्यक्षेत्रातील १२ महाविद्यालयांतील प्राध्यापक उपस्थित होते.या बैठकीत डॉ.सौ.मोरे यांनी मतदार नोंदणीसाठी उत्तम मार्गदर्शन केले.तसेच याकामी जिल्हाधिकारी कार्यालयाने VC द्वारे बैठक आयोजित केली होती.या बैठकीनुसार नवमतदार जनजागृती व नोंदणी याविषयी सांगोपांग पातळीवर सकारात्मक चर्चा झाली. त्यानुसार संबंधित प्राध्यापकाने कार्य करण्याचे ठरवले

डॉ.प्रभाकर माने विद्यार्थ्यांची मतदार नोंदणीसाठी आवाहन करताना

        तहसीलदार कार्यालयाकडून नवमतदार नोंदणीसाठी आवश्यक असणारे मतदार फॉर्म जयसिंगपूर महाविद्यालयास तातडीने पोहोच केले. त्यानंतर कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रभाकर मानेएन.एस.एस. स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी बी.ए.बी.कॉम,बी.सी. ए,बी.सी.एस. व बी.एस्सी. भाग १ व २ मधील विद्यार्थ्यांची नवमतदार म्हणून जनजागृती करून नवमतदार नोंदणी साठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करण्यात आले. सदर जनजागृतीमुळे १११ विद्यार्थ्यांनी नवमतदार म्हणून मतदार नोंदणीचे फॉर्म भरले.

       शिरोळ तहसील कार्यालय, शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्ष व जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजनेच्या या राष्ट्रीय सेवा कार्य मोहिमेचे सर्व विद्यार्थी व नवमतदारांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

  यासाठी उपप्राचार्य प्रा.आर.डी.तासगावकर ,डॉ. नंदकुमार कदम,डॉ.सुनील बनसोडे व कार्यालय अधीक्षक संजीव मगदूम यांचे विशेष सहकार्य लाभले. त्याचबरोबर  कोल्हापूर जिल्हा समन्वय,रासेयो डॉ. संजय पाटील , सहसमन्वयक प्रा. आदिनाथ कांबळे, इचलकरंजी विभाग प्रमुख डॉ. माधव मुंडकर यांचे सहकार्य लाभले. त्याचबरोबर प्रा. मेहबूब मुजावर,जीवन आवळे,गणेश कुरले, विक्रांत माळी कु.नेहा राठोड,कु.दिव्या रासुरे,कु.सातपुते,प्रदूयुन कांबळे,व गौरव पाटील यांच्याकडून मोलाचे सहकार्य मिळत आहे.

1 टिप्पणी: