पोलीस उपनिरीक्षक व पोलीस कर्मचारी यांना मारहाण |
प्रविणकुमार माने : उपसंपादक
आजरा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षाच्या पतीकडून पोलीस उपनिरीक्षकास मारहाण करण्यात आली असून दोन कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आली आहे.या तिघांविरुद्ध आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
आजरा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षाचे पती नगराध्यक्ष योगेश पाटील आणि आशिष रमेश सावंत मल्लिकार्जुन गंगाधर पट्टणशेट्टी या तिघा आरोपीने पोलीस उपनिरीक्षक पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री ९.०० वाजण्याच्या सुमारास आजरा येथील एचडीएफसी बँकेसमोर वाहतुकीचे झालेली कोंडी दूर करण्यास पोलिस उपनिरीक्षक युवराज जाधव यांच्यासह प्रशांत पाटील आणि प्रशांत चौधरी व्यस्त होते. दरम्यान पाटील यांच्यासह तिघे जण एका मोटर सायकलवरून तेथून जात होते यावेळी जाधव आणि तिघांमध्ये शाब्दिक वाद झाला वाहतूक सुरळीत करण्यास आपण आलो असल्याचे सांगत ओळखपत्रही दाखवले. त्या वेळी तिघांनी मारहाण करत कपडे फाटेपर्यंत पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली याबाबत पोलिस उपनिरीक्षक युवराज जाधव यांनी पोलिसात दिली असून तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या घटनेने पोलिसांच्या वर होणारा हल्ला लक्षात घेता या गुंडांची मजल पोलीसाना मारहाण करण्यापर्यंत पोचली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांची अवस्था काय असावी अर्थात खाकी वर्दीचा धाक या परिसरात कमी होताना दिसत आहे अशा प्रकारची चर्चा या परिसरात आहे. पोलिसांना केलेली मारहाण दुर्देवी असून या तिघा विरोधात कोणतं पाऊल उचललं जातं या विषयी लोकांच्या मध्ये चर्चा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा