विनायक तांदळे यांना पुरस्कार देऊन गौरव करताना |
मालोजीराव माने : कार्यकारी संपादक
दि.७/११/२०२१ रोजी पुणे येथे झालेल्या श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५१ व्या जयंती निमित्त मा. श्री. विनायक तांदळे दादा यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मुळात विनायक तांदळे हे ओ. बी. सी. विभाग काँग्रेस उपाध्यक्ष जिल्हा सांगली, सरचिटणीस काँग्रेस इस्लामपूर व अध्यक्ष मानवाधिकार परिषद सांगली जिल्हा यांनी समाजसेवेचा घेतलेला वसा आणि समाजा बद्दल असलेली आत्मीयता लक्ष्यात घेता.श्री संत शिरोमणी नामदेव "समाज रत्न" गौरव पुरस्काराने सन्मानित झाले.
विनायक जी तांदळे यांनी समाज कार्याचा घेतलेला वसा आणि वारसा नित्यनियमाने समाजाच्या उत्कर्ष व विकासासाठी करीत असतात. आजतागायत त्यांनी केलेली समाजसेवा ही उच्च कोटीची असून समाजसेवेसाठी सातत्याने धडपडणारे व समाज बांधवाच्या न्याय व हक्कासाठी अविरतपणे काम करणारे एक संवेदनशील व प्रामाणिक व्यक्ती म्हणून त्यांचा परिचय आहे.
त्यांच्या या पुरस्काराने समस्त संत शिरोमणी नामदेव समाजाचं कार्य करण्यास प्रेरणा मिळाली आहे. प्राप्त पुरस्काराने समस्त समाजामध्ये समाधान व आनंदाचे वातावरण आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा