Breaking

मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०२१

छ.शिवाजी कॉलेज सातारा 'अमृत महोत्सवी वर्षानिमित्त' गुणगौरव पुरस्कारांमध्ये अर्थशास्त्र विभागाने मारली बाजी ; डॉ.अनिलकुमार वावरे ठरले बेस्ट रिसर्च अवॉर्डचे मानकरी

 

डॉ.अनिलकुमार वावरे आणि अर्थशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक पुरस्कार स्वीकारताना

*प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक*


सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा 'अमृत महोत्सवी वर्षानिमित्त' आयोजित गुणगौरव समारंभ २०२०-२१ मध्ये कार्यशील प्राध्यापकांना विविध गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये  रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर व सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे तसेच भारत सरकारच्या उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) या योजनेचे सहाय्यक संचालक डॉ. प्रमोद पाटील हे मान्यवर उपस्थित होते.

      या प्रेरणादायी,आनंदकारक आणि पुरस्कार विजेत्यांच्या मध्ये उत्साह निर्माण करणारा गुण गौरव पुरस्कार येणाऱ्या पिढीसाठी आदर्श होता. सदर कार्यक्रमात शिवाजी महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाला 'प्राचार्य जी.के. पाटील बेस्ट परफॉर्मर डिपार्टमेंट अवॉर्ड' देण्यात आला. त्याचबरोबर अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख व अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रो. डॉ.अनिलकुमार वावरे यांना रयत शिक्षण संस्थेच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा मोठा वाटा आहे व कर्मवीर अण्णांच्या अतिशय जवळच्या व्यक्तींपैकी एक असलेले तसेच कर्मवीर अण्णांच्या प्रदीर्घ, मोठ्या व विश्वसनीय अशा चरित्र ग्रंथाचे 'लेखनकार प्राचार्य डॉ. ए. व्ही. मॅथ्यू बेस्ट परफॉर्मर टीचर'  पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारा सवे डॉ.अनिल वावरे यांना  'प्राचार्य डॉ. एस आर सूर्यवंशी बेस्ट रिसर्चर अवॉर्ड'  देखील देण्यात आला. 

     प्रोफेसर डॉ.अनिलकुमार वावरे व प्रा.किशोर सुतार यांनी लिहिलेल्या 'कोरोनायण' या संदर्भ ग्रंथास 'उत्कृष्ट संदर्भग्रंथ' पारितोषिक देखील देण्यात आले सदर सर्व पारितोषिके प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व प्रत्येकी  रोख रु.५०००/ या स्वरूपात प्रदान करण्यात आली. 

      प्रो. डॉ. अनिलकुमार वावरे हे सध्या छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे अर्थशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत यासोबतच महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक, महाविद्यालयाचे उपप्राचार्य, युवक कल्याण कक्ष समन्वयक, शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन कोल्हापूर ( सुएक) विद्यमान अध्यक्ष , शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाचे चेअरमन अशा विविध पदांवर ते कार्यरत आहेत. अर्थशास्त्र विभाग, डॉ. अनिलकुमार वावरे, प्रा.किशोर सुतार यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल त्यांचा आज या विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. 

     सदर  गुणगौरव पुरस्कार पाहता अर्थशास्त्र विभागाच्या प्रत्येक विद्यार्थी व प्राध्यापकांना शैक्षणिक व संशोधनाच्या क्षेत्रात नवसंजीवनी व बळ देणारा आहे. तसेच प्रा.किशोर सुतार या नवोदित प्राध्यापक लेखकाने लिहिलेलं संदर्भ ग्रंथ हा नवोदित प्राध्यापकांना प्रेरणादायी ठरणार आहे.

     खरोखरच अर्थशास्त्र विभाग व प्राध्यापकांनी केलेली गुणवत्तापूर्ण कामगिरी ही शिवाजी विद्यापीठाच्या किंबहुना शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्ता वाढविण्यासाठी उपयुक्त ठरेल हे निश्चित आहे तसेच हा कार्यक्रम प्राध्यापकांच्या गुणवत्तेला झुकते माप व उत्साह निर्माण करणारा आहे हे सत्य मान्य करावे लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा