Breaking

मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०२१

कोल्हापूर : किरकोळ कारणावरून मित्राचा बॅटने खून

 

Photo source - pudhari


      कोल्हापुरातील वडणगे येथे सोमवारी रात्री किरकोळ भांडणातून दोघा मित्रांमध्ये झालेल्या  हाणामारीत लाकडी बॅटने केलेल्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला. प्रदीप तेलवेकर (वय 35, रा. शिवाजी गल्ली) असे मृत तरुणाचे नाव आहे. घटनेनंतर संतप्त जमावाने संशयित आरोपी निलेश पाटील याला जबर मारहाण केली असून तो आता सीपीआर रुग्णालयात दाखल आहे. 

     प्रदीप तेलवेकर व त्याचा मित्र नीलेश पाटील हे दोघे भरपूर दारू पिऊन तलावाच्या परिसरात रात्री बोलत बसले होते. त्यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद होऊन मारामारी सुरू झाली. रागाच्या भरात नीलेशने बॅटने प्रदीपला मारल्याने  बॅटचा घाव वर्मी बसून प्रदीप जागीच कोसळला. घाबरलेल्या नीलेशने प्रदीपला जखमी अवस्थेत तेथेच सोडून घराकडे धाव घेतली. दरम्यान, प्रदीपचा खून झाल्याची माहिती गावात पसरल्यानंतर संशयित नीलेशला शोधून जमावाने जबर मारहाण केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला.त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा