संग्रहीत छायाचित्र |
इचलकरंजी नगरपालिकेच्या नगररचना विभागातील कर्मचारी व त्यांचा पंटर याला कोल्हापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी वीस हजाराची लाच (₹२०,०००) घेताना रंगेहात पकडले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, यामध्ये नगररचना खात्यातील अधिकारी बबन खोत व किरण कोकाटे असे लाच स्वीकारणाऱ्या दोघा कर्मचाऱ्यांची नावे आहेत. सध्या पालिकेचे कर्मचारी आपल्या न्याय्य व हक्कासाठी काम बंद करून लढा देत आहेत तर दुसरीकडे बंद काळात लाच स्वीकारताना दोन कर्मचार्यांना अटक झाली आहे यामुळे इचलकरंजी नगरपालिकेत खळबळ उडाली आहे.
या घटनेने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांचा हेतू व कार्यपद्धती विषयी आम जनतेमध्ये साशंकता निर्माण झाली आहे.कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने विविध विभागात अधिकारी व कर्मचारी लाच स्वीकारताना रंगेहात पकडले असल्याची माहिती असताना ही अनेक अधिकारी व कर्मचारी कोणालाही न जुमानता लाच स्वीकारतात हे अत्यंत दुर्देवी आहे अशा प्रकारची चर्चा सामान्य जनतेमध्ये होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा