Breaking

सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१

*भारतीय मराठा महासंघ जयसिंगपूर शहराध्यक्ष पदी श्री.अरुण पुकाळे यांची नियुक्ती*

 

मा. अरुण पुकाळे यांना निवडीचे पत्र देताना


*करण व्हावळ : जयसिंगपूर प्रतिनिधी :

                  

     भारतीय मराठा महासंघ, कोल्हापूर यांचे वतीने जिल्हा महिला व पुरुष आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा नियुक्ती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमात जयसिंगपूरचे तरुण, तडफदार व कार्यशील व्यक्तिमत्व मा.अरुण पुकाळे यांची जयसिंगपूर मराठा महासंघ शहराध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

    सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे उपस्थितीत मा. श्री शामराव गायकवाड पाटील, गेवराई तालुका अध्यक्ष, जिल्हा बीड मा. डॉ.सौ वैशाली निंबाळकर ,जिल्हाध्यक्षा भारतीय मराठा महासंघ महिला आघाडी जिल्हा कोल्हापूर मा. श्री सुनील सामंत जिल्हा कार्याध्यक्ष, भारतीय मराठा महासंघ कोल्हापूर मा.श्री मोहनराव शिंदे ,भारतीय मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष कोल्हापूर मा.श्री सुशांत खोत, कागल तालुका अध्यक्ष जिल्हा कोल्हापूर यांच्या उपस्थितीत नियुक्तीचे पत्र देण्यात आले                            

       मा. अरुण पुकाळे एक प्रतिभावंत व कार्यशील व्यक्तिमत्त्व म्हणून शिरोळ तालुक्यात नावाजलेले आहेत. समाजासाठी सातत्यानं कार्यमग्न राहणे हा त्यांचा मूळचा स्वभाव आहे. आजतागायत त्यांनी सामाजिक चळवळीच्या माध्यमातून केलेले काम प्रशंसनीय व समाजासाठी अत्यंत उपयुक्त आहे. जयसिंगपूर शहर अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांची ही जबाबदारी आणखी वाढली असून ते खऱ्या अर्थाने  समाज व राष्ट्र निर्माण कार्यामध्ये आदर्शवत व प्रेरणादायी काम करतील याबाबत शंका नाही. त्यांच्या या निवडीने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा