Breaking

सोमवार, २२ नोव्हेंबर, २०२१

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पंजाब मधील महिलांना या घोषणेने केले आश्वासित


Source : aajtak.in


दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल सध्या पंजाबच्या आगामी विधानसभेच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दौरे सुरु आहेत. पंजाबमधील मोगा इथं एका संभेला संबोधित करताना केजरीवाल यांनी मोठं आश्वासन देऊन समस्त पंजाबकराना आश्चर्यकारक धक्का दिला आहे. केजरीवाल यांनी दिलेल्या या आश्वासनाची सध्या पंजाब मध्ये जोरदार चर्चा आहे. 

      पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आल्यास प्रत्येक महिलेला दरमहा  ₹ 1000  दिले जातील, असं आश्वासन केजरीवाल यांनी दिलं आहे. पेन्शन व्यतिरिक्त हे पैसे मिळणार आहेत, ही जगातील सर्वात मोठी महिला सक्षमीकरण मोहीम असेल असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या महिलाप्रति  आर्थिक सक्षमीकरणाच्या या आश्वासीत धोरणामुळे पंजाबच्या राजकारणात खळबळ माजली आहे.

    मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, आता विरोधक म्हणतील यासाठी पैसे कुठून येणार? पंजाबमधून माफियाराज संपविल्यास पैसे आपोआप येतील. प्रधानमंत्री व मुख्यमंत्री स्वतःसाठी विमान खरेदी करतात. मी खरेदी केलं नाही. मी तिकिट मोफत केलं. केजरीवाल जे बोलतात तेच करतात, ही निवडणूक पंजाबचं उज्वल भविष्यासाठी वेगळी ठरू शकते असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

       मतदान विकासाला करायचं की अन्य घटकाला करायचं हे फक्त महिलाच ठरवतील. कोणत्या उमेदवाराला मत द्यायचं, असं केजरीवाल यांनी ठणकावून सांगितलं. सर्व महिलांनी घरात सांगा की 'इस बार, बस एक बार केजरीवाल'. केजरीवाल सरकारला एकदा संधी देऊन पाहा पंजाब समृद्ध होणार असं आवाहन यावेळी केजरीवाल यांनी केलं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा