खाकी वर्दीतला रक्षकच बनला भक्षक |
प्रविणकुमार माने : उपसंपादक
सांगली : गर्लफ्रेंड सोबतचे असणारे संबंध घरी सांगण्याची धमकी तेच तसेच पैशाची मागणी करीत येथील एका कॉलेज मधील विद्यार्थ्यासोबत पोलिसानेच अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार व माहिती समोर येत आहे. याप्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्याचा खाकी वर्दीतला विकृत पोलीस कर्मचारी हणमंत कृष्णा देवकर (वय वर्ष ३४) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसी खात्याबरोबर अखंड मानवतेला काळिमा फासणाऱ्या या मनोविकृत प्रकाराने सर्वत्र खळबळ माजली आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदर पोलीस कर्मचारी अनैसर्गिक कृत्याची व्हिडिओ क्लीप तयार करुन ती व्हायरल करण्याची धमकी देत त्या विद्यार्थ्याकडे पुन्हा अशा कृत्याची मागणी केल्यानंतर या विद्यार्थ्याने मित्रासोबत पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी सांगितले. हा प्रकार २९ ऑक्टोबर रोजी घडला होता.
याबाबत उपअधीक्षक पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की. दि. २७ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजता पीडित विद्यार्थी हा आपल्या गर्लफ्रेंडला भेटून रुमवर चालला होता. त्यावेळी नाईट पेट्रोलिंग ला असलेला पोलीस हणमंत देवकर व त्याच्या साथीदाराने त्याला अडविले. त्याच्याकडे पुर्ण चौकशी करुन त्याचा मोबाइल नंबर घेवून त्याला सोडून दिले.
त्यानंतर दि. २९ रोजी देवकर हा फोन करुन त्या विद्यार्थ्याच्या रुमवर गेला. त्याने त्या विद्यार्थ्याला तुझ्या मैत्रिणीला माझ्याशी शरीरसंबंध ठेवण्यास सांग नाहीतर तुझ्यावर गुन्हा दाखल करुन हा सर्व प्रकार घरी सांगेन, अशी धमकी दिली. सदर कृत्य नकार दिल्याने देवकर याने त्याच्याकडे पैशाची व अनैसर्गिक शारीरिक संबंधाची मागणी केली. तसेच पैशाची मागणी करत ४ हजार रुपये घेवून त्याने बळजबरीने त्याच्याशी अनैसर्गिक कृत्यही केले. शिवाय या प्रकाराची चोरुन व्हिडिओ क्लिपही बनवली.
ही क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत मनोविकृत देवकर याने पुन्हा त्या विद्यार्थ्याकडे अशा कृत्याची मागणी केली. त्यामुळे त्या विद्यार्थ्याने जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम व माझ्याकडे तक्रार केली. या प्रकाराची शहानिशा केल्यानंतर रविवारी रात्री देवकर याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केल्याचे अधिकृत माहिती उपअधीक्षक पिंगळे यांनी दिली.
सदर घटनेने खाकी वर्दीला डाग लावत 'रक्षकच बनला भक्षक' या वाक्याची प्रचिती या घटनेने आल्याची चर्चा संपूर्ण जनतेमध्ये आहे. सर्वसामान्य लोकांच्या मध्ये या विभागाविषयी साशंकता निर्माण होतं आहे.
Kya din aa gaye
उत्तर द्याहटवा