अशपाक मुजावर याचा सत्कार करताना मान्यवर |
गणेश कुरले : शिरोळ प्रतिनिधी
जयसिंगपूर : इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रीकल्चर रिसर्च, नवी दिल्ली यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या पीएच.डी. एंट्रन्स २०२१ या परीक्षेमध्ये देशात प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल अशपाक शिराजअहमद मुजावर (रा.तमदलगे, ता. शिरोळ) यांचा श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडीत गणपतराव पाटील, माजी खासदार राजू शेट्टी व मान्यवरांच्या हस्ते तमदलगे येथे सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
अशफाक यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण कुमार विद्या मंदिर तमदलगे येथे, आठवी ते दहावी- जनतारा कल्पवृक्ष जयसिंगपूर, अकरावी व बारावी- जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर येथे झाले. गव्हर्मेंट ॲग्रीकल्चर कॉलेज कोल्हापूर येथे बी.एससी. ॲग्री तर इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रीकल्चर रिसर्च नवी दिल्ली येथे एम. एससी. ॲग्री झाले.
२०२१ मध्ये पीएच.डी. एंट्रन्ससाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये प्लँट बायोटेक्नॉलॉजी या विषयांमध्ये अशपाक मुजावर यांनी ४०० पैकी ३९९ गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक मिळविला. तमदलगे सारख्या खेडेगावातून देशपातळीवर उत्तुंग कामगिरी करून अशफाक मुजावर यांनी शिरोळ तालुक्याचा नावलौकिक देशात केला. त्यामुळे श्री दत्त उद्योग समुहामार्फत दत्त कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडीत गणपतराव पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस चंगेजखान पठाण, गोकुळचे माजी चेअरमन दिलीपदादा पाटील, जि. प. सदस्य, दलितमित्र डॉ. अशोकराव माने, दत्तचे संचालक अनिलराव यादव, महेंद्र बागे, शेखर पाटील, माजी जि. प. बांधकाम सभापती सावकर मादनाईक, नृसिंहवाडीचे माजी सरपंच धनाजीराव जगदाळे, नितीन बागे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिरोळ तालुकाध्यक्ष राम शिंदे, सागर धनवडे, शिराजअहमद मुजावर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
त्याच्या या कामगिरीने समस्त कोल्हापूरकरांना त्याचा सार्थ अभिमान वाटत आहे अशी कामगिरी करणारा तो कोल्हापूर जिल्ह्यातील एक विद्यार्थी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा