संग्रहित छायाचित्र |
प्रविणकुमार माने : उपसंपादक
शिरोळ : तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ माजली असून बुबनाळ गावचा तलाठी गजानन माळी यांना लाच प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, जमिनाच्या सातबारावरील बँकेचे कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी तसेच नवीन सातबारा काढण्यासाठी ₹ १०,०००/- ची मागणी केल्याप्रकरणी बुबनाळ गावचे तलाठी गजानन आप्पासो माळी वय वर्ष ४६ यांना लाच लुचपत पथnJLकाने सापळा रचून ही कारवाई केली आहे. सदर कारवाई इचलकरंजी येथे करण्यात आली असून तक्रारदाराने आपले शेत जमीन गहाण ठेवून बँकेचे कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड झाल्यानंतर जमिनीचा सातबारा वरील कर्ज बोजा कमी करण्यासाठी त्यांच्याकडे ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने अर्ज केला होता. दरम्यान तक्रारदाराने अर्ज करून ही जमीन सातबारा काढून देत नव्हता त्याने लाचेची मागणी केल्याने तक्रारदाराने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती त्यानुसार पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस निरीक्षक सतीश मोरे, सहाय्यक फौजदार संजू परमबेकर, सुनील घोसाळकर, नवनाथ कदम, कृष्णात पाटील यांनी सापळा रचून माळी यांनी लाच मागितल्याची पुरावे निदर्शनास आणले. त्यानुसार गुन्हा दाखल करून अटक किल्ल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी दिली आहे.
सदर घटनेने कोल्हापूर जिल्ह्यासह शिरोळ तालुक्यात प्रशासनाविषयी रोष निर्माण झाला असून या घटनेने प्रशासकीय कर्मचार्यांचे धाबे दणाणले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा