उत्कृष्ट अधिविभाग पुरस्कारासह उपस्थित सर्व प्राध्यापक |
प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या ५९व्या वर्धापन दिनी गुरुवार दि. १८, नोव्हेंबर २०२१ रोजी अर्थशास्त्र विभागाने "उत्कृष्ट अधिविभाग पुरस्कार प्राप्त करून शिवाजी विद्यापीठाच्या सर्व अधि विभागात गुणवत्तेची पताका फडकवली आहे.
शिवाजी विद्यापीठाने ५९ व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये विज्ञान व अभियांत्रिकी विभागांतून एका अधिविभागास व अन्य अधिविभागातुन एका विभागास देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप रू. १०,००,०००/- (दहा लाख रुपये), प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह असे आहे. यावर्षी अर्थशास्त्र विभागास विज्ञान व अभियांत्रिकी अधिविभागाव्यतिरिक्त अन्य अधिविभागांतून 'उत्कृष्ट अधिविभाग पुरस्कार' सन २०२१ साठी अर्थशास्त्र अधिविभागाची निवड करण्यात आली आहे.याचबरोबर अर्थशास्त्र विभागास शिवाजी विद्यापीठाचा प्रशासकीय गुणवत्ता पुरस्कारांमध्ये उत्तेजनार्थ पुरस्कार ही मिळालेला आहे.
सकाळी ८.४५ वाजता राजर्षी शाहू सभागृहात आयोजित केलेल्या विद्यापीठाच्या ५९ व्या वर्धापन दिनी अधिविभागातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. ज्ञानदेव तळुले व इतर प्राध्यापक सहकाऱ्यांसह उपस्थित राहुन शैक्षणिक गुणवत्तेचा 'उत्कृष्ट अधि विभाग' पुरस्कार स्वीकारण्यात आला.
शिवाजी विद्यापीठाच्या सर्व अधि विभागात अर्थशास्त्र विभाग हा सातत्याने उत्कृष्ट विभाग म्हणून सर्वोच्च कामगिरी पार पाडत असते. विद्यापीठाच्या स्थापनेपासून आज तागायत अर्थशास्त्र विभागाने विविध बाबींवर उत्कृष्ट कामगिरी केले असल्याची परंपरा आहे. यामध्ये संशोधनात्मक सर्वोच्च कार्य, विभागाच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व आधुनिक व्यवस्था, प्राध्यापक घटकांच्या मध्ये असलेली सामाजिक बांधिलकी व संवेदनशीलता होय. शासनाला विकासात्मक व आर्थिक धोरण आखण्यासाठी कृतिशील आराखडा अर्थशास्त्र विभागाच्या माध्यमातून दिला जात असतो. तसेच राज्यात निर्माण होणारे आर्थिक व सामाजिक प्रश्न यावर संशोधनात्मक कार्य केले जाते. त्याचबरोबर विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांचे करियर व गुणवत्तेसाठी प्रयत्नशील असणे, विद्यार्थ्यांची संशोधनात्मक क्षेत्रात रुची निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. आजपर्यंतचा अर्थशास्त्र विभागाचा प्रवास हा गुणवत्ता व संशोधनात्मक पातळीवर उच्च कोटीचा राहिला आहे. यामध्ये सर्व माजी अधि विभाग प्रमुख, माजी सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे योगदान राहिले आहे.
सध्या विभागात असंख्य कामे सुरू असून कन्सल्टन्सी प्रकल्प चालू आहे. गट ४ वर्षांमध्ये जवळपास ₹ १ कोटी र इतक्या रकमेचे अनेक कन्सल्टन्सी व पॉलिसी प्रोजेक्ट्स पूर्ण झालेली आहेत व अनेक संशोधन प्रकल्पावर कामे चालू आहेत. देश व जागतिक पातळीवरील ख्यातनाम वैज्ञानिक व अर्थतज्ज्ञाची अनेक व्याख्याने विभागामध्ये सातत्याने आयोजित केली जातात.
अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. ज्ञानदेव तळुले, प्रा.डॉ. प्रकाश कांबळे, प्रा.डॉ.सौ.विद्या कट्टी, प्रा.डॉ.महादेव देशमुख, प्रा.डॉ.सुभाष कोंबडे, प्रा.शशिकांत पांचगल्ले व शिक्षकेतर कर्मचारी यांचं मोलाचे सहकार्य मिळाले. तसेच अडजंक्ट प्रोफेसर डॉ. वाय. एस. पी. थोरात यांचे सहकार्य महत्वाचे होते. खरोखरच या सर्व घटकांचे यांचं कार्य खरोखरच कौतुकास्पद व शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयात प्राध्यापक व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे.
शिवाजी विद्यापीठात उत्कृष्ट अधिविभाग हा सन्मान प्राप्त झाल्याबद्दल शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात एकूणच महाराष्ट्रातून तमाम घटकाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा