Source : tamil.oneindia.com |
पर्यटन म्हणजे आनंदाची पर्वणीच असते या आनंदासाठी पर्यटक जगातील कोणत्याही कानाकोपर्यात पर्यटनासाठी हौसेने जात असतात. हे पर्यटन विविध प्रकारचे असते. धार्मिक, ऐतिहासिक, समुद्रकिनारे, भौतिक व जंगल पर्यटन असू शकते. मात्र पर्यटन करताना पर्यटकांनी काही गोष्टींच्या बाबतीत दक्षता बाळगली पाहिजे. कारण दक्षिण आफ्रिकेत अशीच एक दुर्दैवी, विचित्र व अपवादात्मक घटना घडली आहे. जंगल पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटणाऱ्या एका प्रवाशाला टॉयलेटला जाणं चांगलंच महागात पडलं. त्याच्या गुप्तांगाला विषारी सापाने दंश केल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्याची दुर्देवी वेळ आली आहे. मात्र हा पर्यटक महत्प्रयासाने त्याचा जीव वाचला.
सदर घटना हे दक्षिण आफ्रिकेच्या केप टाऊन इथे घडली असून प्रसिद्ध असलेल्या जंगल सफारीचा आनंद लुटण्यासाठी एक ४७ वर्षांचा डच नागरिक आला होता. जंगल सफारी दरम्यान त्याने तिथल्या एका टॉयलेटचा वापर केला. मात्र, त्याचवेळी त्या टॉयलेटमध्ये असलेल्या नागाने त्याच्या गुप्तांगाला दंश केला. दंश झाल्यानंतर तो नागरिक बेशुद्ध पडला. जवळपास तीन तास तो तिथेच पडून होता. जंगल सफारीत सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या एका माणसाला तो टॉयलेटमध्ये बेशुद्धावस्थेत निपचित पडलेला दिसून आला. त्यानंतर त्याला ३६९ किमीचा प्रवास करून रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलं.
या दरम्यान तो शुद्धीवर आला. त्यानंतर त्याला दंश केलेल्या ठिकाणी प्रचंड वेदना आणि जळजळ सुरू झाली. ही वेदना वाढून छातीपर्यंत पोहोचली होती. डॉक्टरांनी त्याला तपासलं तेव्हा त्याचं गुप्तांग आणि वृषण सुजून काळेनिळे झाले होते. त्याचा जीव डॉक्टरांनी त्याची शस्त्रक्रिया केली. त्याच्या गुप्तांगाची पुनर्निर्मिती शस्त्रक्रिया करण्यात आली. सुदैवाने इतका विषारी साप असूनही त्याचा जीव वाचला. दक्षिण आफ्रिकेची जंगलं ही अनेक विषारी सापांचं माहेरघर मानली जातात. येथे राहणाऱ्या आणि पर्यटनासाठी येणाऱ्या अनेकांचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. या डच नागरिकाचं नशीब बलवत्तर होतं, म्हणून दंश झाल्यानंतर इतका वेळ उलटूनही त्याचा जीव वाचू शकला.
संपूर्ण जगात एखाद्या व्यक्तीच्या गुप्तांगाला साप डसल्याचं हे पहिलंच प्रकरण आहे अशी प्रतिक्रिया डॉक्टरांनी दिली आहे. या घटनेने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा