जिल्हाधिकारी मा.राहुल रेखावर |
कोल्हापूर : सध्या नव्या रूपाने प्रकट पावलेला ओमायक्रोन कोरोना ( Omicron ) विषाणूच्या पार्श्वभूमीवर परराज्यातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येण्यासाठी कोविडचे दोन डोस पूर्ण होऊन 14 दिवस पूर्ण झाले पाहिजेत किंवा ७२ तासापूर्वीचा RT-PCR रिपोर्ट निगेटिव्ह असणे आवश्यक आहे.अन्यथा कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली. याची अंमलबजावणी १ डिसेंबर पासून करण्यात येईल. राज्य शासनाने याचे नियम जाहीर केले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
*मास्क असाच हवा.*
नवीन विषाणू हा अधिक घातक असल्याने सिंगल लेयर मास्क किंवा रुमाल चालणार नाही. नाहीतर दंडात्मक कारवाई केली जाईल. एन नाईंटी फाईव ( N-95), थ्री-लेअर सर्जिकल मास्क किंवा, थ्री-लेअर कोणताही मास्क आवश्यक आहे.
*यांना प्रवेश नाही*
ज्यांचे दोन डोस पूर्ण होऊन 14 दिवस झालेले नाहीत त्यांना कोणत्याही शासकीय कार्यालयातील किंवा दुकानात प्रवेश दिला जाणार नाही. वैद्यकीयदृष्ट्या डोस घेऊ शकणार नाहीत, असे ज्यांच्याकडे अधिकृत डॉक्टरांचे प्रमाणपत्र पांना या सक्तीतून वगळण्यात आले आहे. तसेच १८ वर्षाखालील मुले-मुली असल्यास त्याचे आधार कार्ड किंवा वय दर्शविणारे प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक आहे.
*कार्यक्रमासाठी हे असतील नियम*
बंदिस्त हॉलमध्ये आसन क्षमतेपेक्षा 50 टक्के किंवा 100 व्यक्ती तर खुल्या मैदानात किंवा खुल्या जागेत क्षमतेपेक्षा 25 टक्के किंवा 1200 व्यक्तींना परवानगी दिली जाईल. या ठिकाणी कोविडचे सर्व नियम बंधनकारक राहतील. ज्यांची आसनक्षमता ठरलेली नाही ती ठरवण्याचा अधिकार महापालिका संबंधित मुख्य अधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे आहेत
सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क असणे आवश्यक आहे. एकमेकांपासून सुरक्षित अंतर आवश्यक. जर नियम मोडले तर १० हजार व एकापेक्षा जास्त नियम मोडले तर ५० हजार पर्यंत दंड भरावा लागणार.
*प्राथमिक शाळांबद्धल कोणतेही आदेश नसल्यामुळे शाळा एक डिसेंबर रोजी पासून सर्व नियम पाळून सुरू होतील याचीही नोंद घ्यावी*
हे नियम नवीन आदेश येईपर्यंत असतील याची नोंद जनतेने घ्यायची आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा